shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परभणी जिल्ह्यात ८१ कोरोनाबाधित रुग्ण; एकाचा मृत्यू..!

परभणी :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आज शुक्रवारी (दि.४) दिवसभरात ८१ नवीन बाधित आढळले आहेत. दरम्यान, एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ६२४ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये १ हजार ४२५ जणांवर उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ९३० रुग्णांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५४ हजार १९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बाधितांपैकी १ हजार ३०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकूण २ हजार ९५ नमुने तपासण्यात आले. अशी माहिती एका पत्रकान्वये देण्यात आली.
close