शासनाचा लाखोंचा महसूल सर्रास बुडवून अधिकारी गलेलठ्ठ..?
आजपर्यंत अनेकांनी तक्रार करूनही कुठलीही कारवाई नाही..?
अहमदनगर । प्रतिनिधी :-
राज्य महामार्ग क्रमांक १० वर अहमदनगर- शिर्डी- मनमाड रोडवर शिर्डी पर्यंत एका कंपनीचे काम जोरात चालू आहे. सदर कंपनीच्या अंतर्गत काम करणार्या दुसर्या कंपनीने इस्लामपूर गट नं.७६/१- व देहरे परिसरात दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील दगडखाण चालवायला घेऊन सदर खाणमालकाच्या नावाने दि.०६/१०/२०२१ ते २०/१०/२०२१ पर्यंत मा.तहसीलदार,अहमदनगर यांनी फक्त १०० ब्रास डबर वहातूकीसाठी व १०० ब्रास मुरुम वहातुकीस अटी व शर्ती टाकून फक्त १४ दिवसांसाठी डंबर नं.MH.45 AE 3307 या एकाच वाहनासाठी डबर व मुरूम वहातुक करण्यासाठी सदर गट ते कामाचे ठिकाण अंतर १५ कि.मी.पर्यत परवाना दिल्याचे आढळून येते. तीही मुदत आता संपली आहे.
या कंपनीने हजारो ब्रास मुरुम व डबर उत्खनन व शेकडो वाहनातून वहातुक अनधिकृत पणे सर्रास केली व करत आहेत. तसेच सदर परिसरात ही कंपनी डांबर प्लॅन्ट, मिक्सर व स्टोन क्रेशर चालविणे साठी कोणत्याही प्राधिकरणाचे परवाने घेतलेले नाहीत. सहा महिन्यांपासून अनधिकृत पणे उत्खनन, डांबर प्लॅन्ट, मिक्सर प्लॅन्ट, स्टोन क्रेशर चालू असल्याचे दिसून येते आहे.
याचाच अर्थ सदर ठेकेदार कंपनी अनधिकृत पणे काम करत आहे. ही वस्तुस्थिती व प्रत्यक्ष दिसत आहे. तरी यावर नियंत्रण ठेवणार प्रशासकीय यंत्रणा मात्र निश्क्रिय झाल्याचे पहावयास मिळते आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे.
यापूर्वी PWD व जागतिक बॅंक प्रकल्प विभाग, अहमदनगर मार्फत अहमदनगर- शिर्डी-मनमाड रस्त्याचे काम करताना शासनाचा नीधी अवाच्या सव्वा खर्च होवून निकृष्ट व खड्डेमय रस्त्यामुळे अनेकांचे अपघात होवून मृत्यू मुखी पडले आहेत, हे सर्व प्रवांशांनी व जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.म्हणून रस्ता निर्माण होतांनाच वेळेतच जनता जनार्दनाने कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा अनेक ठेकेदार कंपन्या इस्टीमेट प्रमाणे काम न करता वरवर गुळगुळीत रस्ते करून आतील काम कच्चे व कमित कमी करून जनतेला व शासनाला भूरळ पाडून सर्रास फसवितात व मुदतपूर्व तातडीने अधिकारी यांना जादा टक्केवारी देऊन बीले काढून घेतात.एकदा बील काढल्यावर त्या एजन्सी व ठेकेदार यांना कामाविषयी काही एक देणे घेणे नसते.
याचा सर्व भार जनतेवर कळत-नकळत पडत असतो. कररुपाने हा पैसा आपल्याकडूनच वसूल केला जातो. यासाठी नागरिकांनी सदैव जागरूक असले पाहिजे.
यासाठी सर्वसामान्य जनतेला हा विषय कळावा यासाठी शेतकरी संघटना परिवाराचे सुधाकर कराळे यांनी जनहित लक्षात घेऊन विनम्र आवाहन केले आहे की,
"सदर कामाचे स्वरूप काय? खर्च किती ?
सदर कामासाठी नेमलेली ठेकेदार कंपनी कोणती? हे कधी जाहीर करणार?
हे तपशील तसेच "चुकीचे निकृष्ट दर्जाचे काम दिसले तर बीनदिक्कत कळवा! " हे अवाहन करणारे साधे फ्लेक्स फलक जागो जागी लावा... त्यावर संपर्क नंबर नमुद करा.....
तक्रारींची दखल घ्या ! अर्थात सवड आणि सार्वजनिक कामाविषयी आस्था असली तर सर्वांना शक्य होईल..! "
सुधाकर कराळे, शेतकरी संघटना परिवार,
देवळाली प्रवरा, ता. राहुरी, अहमदनगर.






