shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहाण्या माणसाने गाढव आणून, पोलीस, तहसीलदार यांना हाताशी धरून केली लाखो रुपयांची कमाई...!

गाढवावरुन रेती चोरीचा अफलातून नवा फंडा

पूर्णा । वार्ताहर:- शहरा लगत असलेल्या पूर्णा नदी पात्रातून गत अनेक दिवसांपासून महसूल अधिका-यांना हाताशी धरुन काही जणांनी चक्क पन्नास नवीन गाढवं खरेदी करुन त्यावरुन अवैध रित्या रेतीची तस्करी सूरु केली.नदी पात्रातून चोरुन रेती आणून ती गाढवावरुन वाहतूक करीत शहरात विक्री केली जाते.गाढवावरुन रेती चोरीचा अफलातून नवा फंडा वापरला जातो आहे.

     संग्रहीत चित्र

गाढवावरुन बिनदिक्कतपणे रेतीची चोरी करुन यातून लाखो रुपये काळी माया जमवली जात आहे.रेती चोरण्यासाठी गाढव फार उपयोगी पडते. शिवाय त्या कडे प्राणी असल्या कारणाने दूलर्क्ष होते व प्राण्यांवर सहसा महसूल खात्याचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करु शकणार नाहीत? या मुळे रेतीची चोरी करण्यासाठी मुद्दामहून गाढव खरेदी केली जातात.गाढवावरुन रेती चोरी करणे सहजसोपे जाते.त्यामुळे टिप्पर मधून रेती चोरी करण्याची गरज पडत नाही आणि शासनाकडे लिलावात भाग घेवून टेंडर वाळू ठेका घेण्याची गरज पडत नाही.तसेच राॅयल्टी भरण्याची शुध्दा आवश्यकता नाही. 

याचमुळे रेती चोरुन विकायची तर गाढवावरुन वाहतूक करणे सोपे होत असल्याने वाळू चोरी करणा-याचा हा अतिशय सोपा मार्ग आहे.तसेच गाढवावरुन रेती चोरुन ती विक्री करुन वर्षाकाठी लाखो रुपये कमवता येतात.यामुळे बरेच दरवर्षी नवीन गाढवे खरेदी करुन त्यावरुन अवैध रेती चोरी ही पूर्णा नदी पात्रातून करीत आहेत.याकडे पूर्णा तहसीलदार, गौनखनीज खाते अधिकारी,मंडळ अधिकारी, तलाठी हे जाणिवपूर्वक गाढवावरुन रेती तस्करी करणाराकडे कानाडोळा करतात.अधूनमधून मंडळ अधिकारी, तलाठी यांना वरदक्षिणा देवून खुश केल्याची माहिती समोर येत आहे.पूर्णा शहर व परिसरात गाढवावरुन रेती चोरी करणाराकडे परभणीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी हे लक्ष देवून हा प्रकार बंद करतील काय? असा सवाल नागरिक करीत आहेत.
close