shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा येत्या १८ तारखेपासून होणार सुरु..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 रविवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२     


शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा येत्या १८ तारखेपासून होणार सुरु..!!

अहमदनगर :   कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली .
नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत होत आहे.
 
सध्या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये बंगलुरूसाठी 02, दिल्ली 01, हैदराबाद 01, चेन्नई 01 अशा पाच विमानफेर्‍या आहेत. आता पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा सुरु होणार आहे.

पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरवरुन शिर्डीला येईल व तेथून पुणे येथे जाणार आहे.

ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरु ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रवासी किती मिळतात, यावरच ही सेवा यामार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय होणार आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close