shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रचंड गूढ आणि उत्सुकता लागलेल्या भव्य शिवतीर्थ लोकार्पण सोहळा आज सायंकाळी होणार साजरा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२     

 
प्रचंड गूढ आणि उत्सुकता लागलेल्या भव्य शिवतीर्थ लोकार्पण सोहळा आज सायंकाळी होणार साजरा..!! 

अहमदनगर : नगर शहरातील माळीवाडा स्टॅण्ड जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज छत्रपती शिवरायांची मूर्ती एका नव्या आकर्षक नेत्रदीपक आणि शिव-स्फुल्लिंग चेतवणार्या देखण्या रुपात पहावयास मिळणार आहे.
आज सायंकाळी पाच वाजेपासून या भव्यदिव्य सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. विविध शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येत 'अखंड हिंदू समाज, नगर' यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 

नगरच्या माळीवाडा एसटी स्टॅण्ड समोर असलेल्या चौकात 1955 साली पंचधातुची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी शिवजयंती निमित्ताने मूर्तीला ऑईलपेंट दिला जात होता. मूर्तीवरील ऑईलपेंट अनेकवर्षे साचल्याने त्याचे थरवाढत जाऊन त्याच्या खपल्या पडायला लागल्या होत्या.
 
ही बाब शिवप्रेमींनी महानगरपालिका आयुक्तांना लक्षात आणून देत याच मूर्तीला नव्याने व्यवस्थित रूप देण्यासाठी विनंती केली होती, प्राप्त माहिती नुसार ही परवानगी नाकारली गेली मात्र शिवप्रेमींनी नाउमेद न होता शहराच्या लोकप्रतिनिधींना यात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला यश येत पुढील कार्यवाही सुरळीत पार पडून परवानगी, निधीची व्यवस्था झाली.
 
गेल्या पंधरा दिवसांमूर्तीचे नाविन्यपूर्ण काम पूर्णत्वास आले. जागेवरच मूर्तीला आडोसा करून काम सुरू करण्यात आले होते. अमेरिकेत शिल्पकलेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले नगरचे प्रसिध्द शिल्पकार विकास कांबळे यांनी आता आहे त्याच मूर्तीवर काम करत मूर्तीला आकर्षक नावीन्य दिले आहे. यासाठी त्यांनी अमेरिकन पॉलिस वापरले आहे. आत ही मूर्ती अगदी नव्या रुपात झळाळी असलेली दिसणार आहे.
 

आज रविवारी हा भव्य शिवतीर्थ सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी एकवीस ब्राम्हणां कडून काशीहून आणलेल्या पवित्र गंगा जलात अभिषेक करणार आहेत, जवळपास दीड तास हा अभिषेक मंत्रोच्चारात हिंदू धार्मिक विधी पद्धतीने होईल. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्या पद्धतीने भव्यदिव झाला, असेच स्वरूप यावेळी असणार आहे. यानंतर गोल मखमली शामियानात झाकलेला शामियाना मान्यवरांच्या हस्ते शामियाना हटवून मूर्तीचे लोकार्पण केले जाणार आहे. स्वातंत्रवीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांवर रचलेली आरती यावेळी म्हंटली जाणार आहे.
  

भव्य पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या भव्य शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्याची मोठी उत्सुकता आणि गूढ जिल्हावासीयांत आहे. अनेक शिवप्रेमींनी या सोहळ्या बाबत शहरभर भव्य आणि लक्षवेधीअसे बॅनर्स झळकवले आहेत. अनेक पक्ष, संघटनांनी सोहळ्यास शुभेच्छा फलक लावलेले आहेत. हा सोहळा काय आणि कसा असेंल्झ मुख्य अतिथी कोण, कुणाच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा साजरा होणार याबद्दल आयोजकांनी गूढता कायम ठेवली आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close