शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२
महेश मुनोत विद्यालयात स्वातंत्र्यसेनानी कै.बाबुशेठ मुथा यांची ५४ पुण्यतिथी साजरी..!!
राहुरी : स्वातंत्र्यसेनानी कै.बाबुशेठ मुथा यांचे वांबोरी व पंचक्रोशीत सामाजिक, शैक्षणिक कार्य व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अजोड असल्याचे प्रतिपादन डाॅ.अतुल झंवर यांनी केले.
वांबोरी येथील महेश मुनोत माध्य. व ऊच्च माध्य. विद्यालयात स्वातंत्र्यसेनानी बाबुशेठ मुथा यांची ५४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन हेमंत मुथा होते. डाॅ.अतुल झंवर म्हणाले की, बाबुशेठ मुथा यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे होते. दातृत्व नेतृत्व व कर्तृत्व या कार्यामुळे ते सर्वांच्या स्मरणात आहेत.
यावेळी प्रा.शाम पटारे, बाबासाहेब पटारे यांनी त्यांच्या जीवनकार्यांचा आढावा घेतला. प्राचार्य अजय बारगळ, उपप्राचार्य भीमराज आव्हाड, वंदना आरण्ये, प्रा.संजय तमनर, शिवाजी मंडलिक, राजू कुसमुडे, जोत्सना तोडमल, अर्चना मकासरे, शोभा सुडके, प्रा.शुभांगीनी, भोसले, बाबा पटारे आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पवार यांनी तर सूत्रसंचालन दिंगबर शिंदे, तर आभार सचिन कराळे यांनी मानले.
सचिन घोडे यांनी बाबुशेठ मुथा यांचे काढलेले पेन्सिल चित्र लक्ष वेधून घेत होते तर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक पुष्प रांगोळी रेखाटून बाबुशेठ मुथा यांना अभिवादन केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

