shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशाताई भोसलेंचा फोटो टाकून वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२

आशाताई भोसलेंचा फोटो टाकून वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली..!!

शिरुर तालुक्यातील राजकीय व्यक्तीच्या नावाने चुकीची पोस्ट...


शिक्रापूर : पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांच्यानावे कोणीतरी लता मंगेशकर यांच्या ऐवजी आशा भोसले यांचा फोटो टाकून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली असून सदर पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे.
 
     भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झालेले असताना अनेकांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली तर अनेकांनी श्रद्धांजली बाबत पोस्टर प्रसारित केलेले असताना पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांच्यानावे कोणीतरी श्रद्धांजली पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित करत त्यामध्ये लता मंगेशकर यांचे ऐवजी आशा भोसले यांचा फोटो टाकून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली सदर पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले.



मात्र चुकीच्या पद्धतीने पंडित दरेकर यांच्या नावाने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली गेल्याचे समोर आल्याने पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस पंडित दरेकर यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल करत सदर कृत्य करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close