शिर्डी । प्रतिनिधी :
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश व पात्रता परिक्षेत प्रथम प्रयत्नात ७२० पैकी ५८७ गुण मिळवून सोलापूर येथील डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम "फेरीत वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविल्याबद्दल राहाता येथील सेंट ऑन स्कूलची माजी विद्यार्थिनी कृतिका भारत सुंडाळे हीचा सत्कार सेंट जॉन स्कूलमध्ये वतीने करण्यात आला.
देशात एमबीबीएस अभ्यासासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी १६ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कृतिका काहिने राष्ट्रीय पातळीवर २४ हजार ६८९१ वा तर राज्य पातळीवर १ हजार ७६९ वा क्रमांक 6 मिळविला आहे. कृतिका ही पत्रकार सुभाष सुंडाळे यांची नात व राहाता येथील दंत चिकित्सक डॉ. भरत सुंडाळे व डॉ. संगीता सुंडाळे यांची कन्या आहे.

