शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२
एकाच कुटुंबातल्या दोघा मुलांसह चौघांनी घेतले विष..!!
श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यात अनेक खळबळजनक घटना सातत्याने घडताना समोर येत आहेत. आता एकाच कुटुंबातील पोटचा मुलगा, मुलगी यांसह चौघांनी विष प्रशासन करून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
शहरानजिक गोंधवणी कॅनॉल परिसरात सदर घटना घडली आहे. सदर कुटुंब याच परिसरात वास्तव्यास आहे.
रत्नाकर उत्तम सूर्यवंशी (वय 47), सौ. लक्ष्मी रत्नाकर सूर्यवंशी (वय 39), रुपेश रत्नाकर सूर्यवंशी (वय 19) व कु. रेणुका रत्नाकर सूर्यवंशी (वय 17) असे विष प्रश्न केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान हि घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली होती.
त्यानंतर या व्यक्तींना दवाखान्यात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काल शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या चारही रुग्णांवर सध्या योग्य उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या निगराणीखाली सध्या हे रुग्ण आहेत. सूर्यवंशी कुटुंबातील या चौघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण मात्र समजून शकले नाही.
दरम्यान जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या अनेक घटणा यामागे उघडकीस आल्या आहेत. नुकत्याच एक डॉक्टर , तसेच केडगाव मधील व्यापारी यांच्या आत्महत्येचे प्रकरणे अजून ताजेच आहेत.
आता लगेच हि घटना घडली. दरम्यान या सूर्यवंशी कुटुंबातील चौघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण मात्र समजून शकले नाही.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

