shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकर्‍यांचा ताडकळस येथे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको..!

पूर्णा । वार्ताहर :-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे आज शुक्रवारी (दि.४) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


 या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह बाळासाहेब घाटोळ, पंडित भोसले,भगवान शिंदे, दिगंबर पवार, पांडुरंग दुधाटे, प्रसाद गरुड, माणिक  गरुड, मुंजाभाऊ लोडे, माऊली शिंदे, उद्धव जवंजाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  ऊस तोडणीचा कालावधी अंतीम टप्प्यात येऊन ठेपला आहे. तोडणी पश्चात १४ दिवसानंतर ऊसाची एफ.आर.पी. ची रक्कम शेतकर्‍यांना देणे कायदेशीररित्या बंधनकारक असून काही कारखान्यांनी कायद्याचे उल्लंघन राजरोसपणे केले आहे.

ऊस तोडणी करण्यासाठी वेगवेगळ्या जाचक अटी घालत आहेत. या सर्व अन्यायाविरुध्द रास्ता रोको करण्यात आला. तर ऊस तोडणीसाठी एका शेतकर्‍यास १५० टनाची अट व शेअर्सची अट रद्द करण्यात यावी, चुकीच्या पध्दतीने रिकव्हरी काढुन ऊसाचा फड तोडणीसाठी टाळण्यात येत असलेला प्रकार बंद करण्यात यावा. सर्व कारखान्यांनी ऊस तोडणीनंतर एफ.आर.पी. कायद्याप्रमाणे १४ दिवसानंतर ऊस बिल शेतकर्‍यांच्या खात्यात नियमीतपणे जमा करावे. आदी मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आंदोलनाद्वारे  करण्यात आली आहे. 
close