*सुरेल सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी:आपल्या सुरेल सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संगीत साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' गेल्या आठ दशकाहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वर्गीय सुरांनी आज विराम घेतला. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने आज संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.'

