तरंगवाडी येथे डॉ. शशिकांत तरंगे यांचा अभिष्टचिंतन विविध समाजकी उपक्रमाने साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे यशवंत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांचा दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजी अभिष्टचिंतन दिन तरंगवाडी ग्रामस्थ व यशवंत प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिर करण्यात आले यामध्ये ११५ जणांची तपासणी केली तर ३५ रुग्णांना चष्मा वाटप आणि १७ रुग्णांना ऑपरेशन साठी घेऊन जाणार आहेत, सदर तपासणी डॉक्टर मोहम्मद ठा स र वाला पुणे, प्रतिनिधी दिनेश जैन, सचिन खरात इत्यादी होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी अंतर्गत तरंगवाडी आरोग्य केंद्र यांच्या वतीने डॉक्टर सुश्रुत शहा वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर प्रतिभा गा डे वैद्यकीय अधिकारी, काळे एस ए आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक कुंभार बि.बी, उत्तेकर डी व अश्विनी तरंगे भोसले संगीता आशाताई यांच्या साह्याने गावातील कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले यामध्ये २५५ डोस देण्यात आले.
इंदापूर बारामती लगत तरंगवाडी कमानी पासून रस्त्यालगत विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून त्या वृक्षांना संरक्षण म्हणून ताराची जाळी बसवण्यात आली.
सदर अभिष्टचिंतन दिन हा गावातील ग्रामस्थांना उपयोगी असे उपक्रमाचे आयोजकांच्या वतीने आयोजित केल्याने डॉ. शशिकांत तरंगे यांचा अभिष्टचिंतन दिन हा आनंद उत्सव दिन म्हणून चाहत्यांनी साजरा केला. डॉ. शशिकांत तरंगे यांचा अभिष्टचिंतन दिनानिमित्त जागोजागी शुभेच्छा फलक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तरेंगे यांचा महाराष्ट्रातील वाढता संपर्क असल्याने त्यांना अनेक माध्यमातून शुभेच्छा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचेही दिसून येत आहेत. सदर कार्यक्रमास पोलीस पाटील दादासाहेब माने, तरंगवाडी चे सरपंच संतोष जाधव,गोखळी चे उपसरपंच सचिन तरंगे, तरंगवाडी चे तंटामुक्ती समिती अध्यक्ष शिवराज गावडे, माजी उपसरपंच तुकाराम तात्या करे, माजी उपसरपंच आजिनाथ तरंगे, ग्रामपंचायत सदस्य सुहास बुटे, माजी उपसरपंच आप्पासाहेब शिंदे, माजी सरपंच कांतीलाल बुणगे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा तरंगे, ग्रामपंचायत सदस्य दादा पाटील, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चितळकर, बाळासाहेब हरणावळ सर, बाळासाहेब सदाशिव तरंगे, पैलवान नाथा भाऊ मारकड, अक्षय तरंगे, दादा हरिदास तरंगे, महेंद्र सिनगारे, सार्थक फडतरे, पैलवान लखन तरंगे, जयवंत तरंगे, माऊली शिंदे माजी सरपंच, पैलवान दादा तरंगे, लखन तरंगे, परशुराम तरंगे, अमोल डोंबाळे, संतोष तरंगे, लक्ष्मण तरंगे, सोपान करे, सतीश गावडे, पांडुरंग कांबळे, नामदेव शिरसागर, वैभव तरंगे, महादेव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. शशिकांत तरंगे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९८६ साली झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हे तरंगवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले . माध्यमिक शिक्षण माळशिरस येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण व पशुवैद्यकीय सेवा वेटरनरी कॉलेज अकलूज या ठिकाणी शिक्षण घेतले.
शिक्षण सुरू असताना समाज कार्यात ते सतत सहभागी होते. समाजकार्याला सुरुवात त्यांनी या काळातच केली.
त्यांनी इंदापूर येथील तलावातील उद्यानाला अहिल्यादेवी होळकर नामकरण करण्यासाठी त्यांनी जे आंदोलन केले होते. त्या आंदोलना वेळी त्यांना येरवडा जेलमध्ये दोन महिन्याचा कारावास भोगाला. त्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी तरंगवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल तयार करून स्वतः तरुण सरपंच झाले. त्यावेळी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे महाराष्ट्रातील पहिला सरपंच म्हणून बहुमान मिळवला.
तरंगवाडी गावातील विविध विकास कामांमध्ये भर पाडण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केला. तसेच सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी वेळोवेळी शिबिराचे आयोजन केले. वृद्ध माता-पित्यांचा सत्कार समारंभ त्यांनी आयोजित केलेला होता. सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा निवडून आणून तरंगवाडी ग्रामपंचायत ची विकास कामे चालू आहेत.
डॉ. शशिकांत तरंगे हे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस पदावरती असून ते यशवंत प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य त्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच धनगर ऐक्य अभियानाचा संकल्पक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज जनजागृती करून समाज शोषण थांबली जावी यासाठी आरक्षण खूप महत्त्वाचे आहे या विषयावर त्यांनी पंढरपूर बारामती पदयात्रा काढून नऊ दिवस उपोषण केले. या पदयात्रा मध्ये महाराष्ट्रातील अनेक मान्यवर यांनीही सहभाग नोंदविला. त्यांच्या या दूर्दृष्टी विचाराने आणि भूमिकेने ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळातील जनतेपर्यंत विचाराने आणि प्रत्यक्ष पोहोचले दिसून येतआहेत.

