shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल इंदापूर तालुका सरचिटणीस पदी पडस्थळ येथील नाथसाहेब चौगुले यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल इंदापूर तालुका सरचिटणीस पदी पडस्थळ येथील नाथसाहेब चौगुले यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते निवडीचे  दिले पत्र.
इंदापूर प्रतिनिधी:पडस्थळचे नाथसाहेब बाबुराव चौगुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल च्या इंदापूर तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस चे भटक्या विमुक्त जाती जमाती सेल इंदापूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी त्यांची निवड केली असून सदर निवडीचे पत्र इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या हस्ते इंदापूर तालुका पक्ष कार्यालयामध्ये दि. ६ फेब्रुवारी रोजी देण्यात आले. सदरवेळी हनुमंत कोकाटे यांनी नाथसाहेब चौगुले यांचे अभिनंदन केले.

यावेळी अण्णासाहेब धोत्रे, रमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका पदवीधर मतदार संघ अध्यक्ष, विठ्ठल महाडिक, सचिन शिरसट, गणीम सय्यद, अक्षय कोकाटे इत्यादी उपस्थित होते.

सदर निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रियाताई सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भटक्या विमुक्त जाती जमाती सेल चे कार्य व ध्येयधोरण लोकांपर्यंत पोचवणे व सार्वजनिक कामांमध्ये भाग घेऊन लोकांना मदत करणे .तसेच पक्ष संघटना मजबूत करून पक्ष बांधणीचे काम करण्यासाठी नाथसाहेब बाबुराव चौगुले पडस्थळ यांची निवड करण्यात आल्याचे  अण्णासाहेब धोत्रे यांनी यावेळी सांगितले.
close