असंघटित कामगार व व्यावसायिकांना ई- श्रमिक कार्ड महत्वाचे - वसिम भाई बागवान*
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने
व्यंकटेशनगर, राजेवलीनगर, शाहुनगर, अनपट वस्ती,सातपुते वस्ती,बाब्रस मळा ,येथील सर्व असंघटित कामगार व व्यावसायिकांचे भारत सरकार मान्यताप्राप्त ई-श्रमिक लेबर कार्ड योजना मोहीम आयोजित करण्यात आले होते . या मोहिमे मध्ये अनेक कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला. प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेशनगर येथे असंघटित कामगार खुप मोठ्या प्रमाणात असल्यांमुळे येथील असंघटित कामगारांना व व्यावसायिक चे ई- श्रमिक कार्डचे खुप मदत होणार आहे. या मोहिमेचे आयोजन सामाजिक कार्यकर्त वसिम भाई बागवान यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ आणि १६ फेबुवारी या दिवशी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वसिमभाई बागवान, साजन ढावरे ,विकास खिलारे, हाय्युल बागवान ,त्रुषिकेश उत्तेकर, अरबाज बागवान ,सदाम बागवान ,राजु ढावरे ,कुष्णा सुर्यवंशी ,इक्बाल सय्यद, असिफ सय्यद हे उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

