परभणी :(:प्रतिनिधी ):
मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शहरातील वसमत रोड वरील दत्तधाम येथे शनिवार (दी.१९) रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.त्यानंतर भव्य रक्तदान शिबीर व पाणपोईचे उदघाटन नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच सोमवार (दि.२१)रोजी दत्तधाम परिसर कारेगाव येथील सरस्वती विद्यानिकेतन विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय सहित्याचे वाटप करण्यात येणार .सर्व शिवप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवहान आयोजक ज़िल्हाध्यक्ष रामदास आवचार, युवक ज़िल्हाध्यक्ष सुनिल आवचार , मराठवाड़ा संपर्क प्रमुख सुनिल मोहीते, युवक तालुकाध्यक्ष अर्जुन पोंढे, यशवंत रेकणे, ओंकार जावळे ,शिवाजी भालेराव, विषणु गाडेकर, अनिल आवचार ,संतोष आवचार आदीसह मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

