shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मलिक यांच्यावरील झालेली कारवाई चुकीची - महाविकासचे निवेदन...!

एरंडगाव । प्रतिनिधी :
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केलेली कारवाई चुकीची असून ती कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

        फोटो प्रवीण खोमणे.

तहसीलदार यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलीक हे राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री असून ते सातत्याने भाजप व केंद्रीय यंत्रणेच्या कारवाई विरोधात आवाज उठवत आहेत मात्र महाविकास आघाडीतील नेते त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमच्या विरोधात बोलाल तर तुमचीही गत अशी होईल. असा इशारा या कारवाईतून दिसून येत आहे. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या विरोधात एकवटले असून अशा स्वरूपाच्या कारवायांना यापुढे  जशासतसे उत्तर दिले जाईल.

यावेळी जेष्ट नेते काकासाहेब नरवडे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस अरूण पा.लांडे,राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष संजयजी कोळगे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव नेमाणे,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष अविनाश मगरे,भारतीय कांग्रेसचे अध्यक्ष अमोल फडके,भारतजी लोहकरे,संजुभाऊ फडके,शहराध्यक्ष मन्सुर भाई फारोकी,शितलजी पुरनाळे,निजाम पटेल, एकनाथजी कुसळकर,सिद्धांत कांटे,महेश काटे,कापरे,संतोष जाधव,समिर शेख,संभाजी तिडके,हनुमान पातकळ,संतोष पावसे,वाहाबभाई शेख,रोहित काथवटे, राजू मगर ,अविनाश सारडा, राहुल सावंत, अनिल सरोदे, सोमा मोहिते, बप्पासाहेब लांडे, विठ्ठल पंडित यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close