shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धोत्रे येथील साखळी उपोषणात शिक्षक भारती संघटनेचा जाहीर पाठिंबा- महेश पाडेकर

स्मार्ट सिटी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे दोन महिन्यापासून साखळी उपोषण

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ८-३-२०२२

शेतकरी बचाव संघर्ष समिती धोत्रे, बापतरा, लाखगंगा, गंगापूर, पुरणगाव येथील शेतकऱ्यांनी ६५ दिवसापासून साखळी उपोषण पुकारले आहे ते उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळण्यासाठी अहमदनगर शिक्षक भारती संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला असे प्रतिपादन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव महेश पाडेकर यांनी केले. 

मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग लगत कृषी समृद्धी केंद्र होण्यासाठी झालेल्या सर्वेक्षणात धोत्रे, बाबतारा लाखगंगा, पुरणगाव येथील शेतकऱ्यांच्या सुपीक, बागायती जमिनी जात असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल दोन महिन्यापासून साखळी उपोषण सुरू केले आहे तरीदेखील प्रशासनाला जाग येत नाही त्यांना न्याय मिळण्यासाठी शासन मान्य शिक्षक भारती संघटना शासन दरबारी पाठपुरावा करणार असे महेश पाडेकर यांनी सांगितले या प्रसंगी संजय चव्हाण, फकिरा वैद्य, नारायण शिंदे, भगवान कांबळे, कोपरगाव काँग्रेसचे उपाध्यक्ष विष्णू पाडेकर, कचेश्वर घाटे, साहेबराव गागरे, आदर्श पाडेकर आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
close