shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडमांजरसुंभा येथील गर्भागिरीच्या डोंगरात पशु-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय ; शिवभक्त प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २९ मार्च २०२२   

गडमांजरसुंभा येथील गर्भागिरीच्या डोंगरात पशु-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय ; शिवभक्त प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम..!!

 वांबोरी : गडमांजरसुंभा येथील गर्भागिरीच्या डोंगरात तसेच परिसर व घाट गणपती या भागात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे भरण्याचा उपक्रम दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवभक्त सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतला आहे.
         तीव्र उन्हाची परिस्थिती लक्षात घेऊन गर्भागिरी परिसरातील वन्यप्राण्यांना टँकरने पाणी टाकून व चारा देण्याचे काम चालू आहे. गर्भगिरी पर्वत रांगेत अनेक प्रजातींचे वन्यप्राणी वावरत असतात. यामध्ये तरस, साळिंदर, घोरपड, वाघ, मोर, ससा, कोल्हा, रानमांजर आदीसह प्राणी व पक्षी राहतात. चरण्यासाठी आलेले शेळ्या-मेंढ्यांचे कळप सुद्धा या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतात. 

      त्यामुळे तहान भागवण्यासाठी शिवभक्त सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पाणवठ्यावर पाणी टाकण्याचे काम दरवर्षीप्रमाणे सुरु आहे. यंदा हा उपक्रम दिनांक २८ मार्च ते ५ जून याकाळात सुरू राहणार तरी या उपक्रमासाठी वांबोरी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. व्ही एम झंवर व उद्योगपती जुगलशेठ राठी व कृषी सहाय्यक अधिकारी विजय कापसे साहेब तसेच शिवभक्त सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गोरक्षनाथ दुधाडे व राम भरसाकळ, विनोद साहाणी , मिनीनाथ व्यवहारे, तात्या कांबळे, आदि. नी सहभाग घेतला.
       या उपक्रमासाठी शिवभक्त सामाजिक प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व वांबोरी पोलीस दूरक्षेत्र व सर्व मित्र परिवार या कार्यक्रमासाठी मदत करीत असून अनेक मान्यवर उपस्थित होते. आपण या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवभक्त सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close