shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

असोला येथे वृध्द पती - पत्नीचा खून; अन्य जखमी महिलेला नांदेडला हलविले..!

पूर्णा । वार्ताहर :-
परभणी जिल्ह्यात ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोला येथे ६० वर्षीय महिला व तिच्या ६५ वर्षीय पतीचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.१६) सकाळी उघडकीस आली. या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींची नावे शंकरराव ग्यानोजी रिक्षे (वय ६५ वर्ष), सारजाबाई रिक्षे (वय ६० वर्ष) अशी आहेत.  या घटनेचे नेमके कारण मात्र समजु शकलेले नाही. 

या घटनेत अन्य  एक महिला गंभीर जमखी झाली असून तिला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.  या  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व ताडकळस पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.
 याबाबत माहिती अशी की असोला येथील शंकरराव ग्यानोजी रिक्षे वय ७० व सारजाबाई शंकरराव रिक्षे हे दोघे रात्री जेवण करून झोपले होते, त्यांच्या समवेत मेहुणी गिरजाबाई गोविंद आडकिने याही मुक्कामी होत्या, आडकिने यांच्यासोबत एक अज्ञात तरुण मुक्कामी होता. 

सकाळी शेजारील व्यक्तींनी घराचे दार लोटून का उठले नाहीत म्हणून पाहिले असता, शंकरराव  व सारजाबाई रिक्षे हे दोघे रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर गिरजाबाई आडकिने या गंभीर अवस्थेत बाजूला दिसून आल्या, ग्रामस्थांनी तातडीने ताडकळस पोलिसांना माहिती कळवली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी धावून आले. गिरजाबाई आडकिने यांना प्रत्यक्षदर्शींनी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक असून तसेच ठसे तपासणीचे काम सुरू केले आहे. या प्रकाराने या गावात मोठी खळबळ उडाली आहे दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी कोणताही खुलासा केला नाही.
close