shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तो विजय माझा नव्हताच तर विश्वास दाखवलेल्या मतदारांचा होता - माजी सभापती पुष्पाताई रेडके.

तो विजय माझा नव्हताच तर विश्वास दाखवलेल्या मतदारांचा होता - माजी सभापती पुष्पाताई रेडके.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बिजवडी पंचायत समिती गणातून आपण सर्वांनी मला निवडून दिले.खरंतर तो विजय माझा नव्हता तर तो विजय माझ्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचा होता. तो विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा  होता. असे  माजी सभापती व पंचायत समिती सदस्या पुष्पाताई रेडके यांनी दिनांक १४ मार्च २०२२ रोजी पाच वर्षे पूर्ण होऊन कार्यकाळ संपला. याबद्दल इंदापूर तालुक्यातील जनतेचा व बिजवडी गणातील मतदारांचे आभार व्यक्त करताना आपले मत व्यक्त केले.
२०१७ च्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सर्व पदाधिकारी, मित्र-मैत्रिणी, मतदार संघातील मतदार बंधू- भगिनी, गावकरी या सर्वांच्या आशीर्वादाने आयुष्यातील माझ्या पहिल्याच निवडणुकीत पंचायत समितीला मिळालेल्या विजयामुळे मला लागलेल्या गुलालाची आठवण या आयुष्यात तरी विसरू शकत नाही. मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या व सदैव पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या व आशीर्वाद दिलेल्या सर्व जनतेचे जाहीर आभार व्यक्त करते.
 यावेळी इंदापूर तालुका पंचायत समिती नियोजन समितीचे सदस्य महेंद्र रेडके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पुष्पाताई रेडके यांना पाच वर्षापूर्वी पंचायत समिती सदस्य पदी ज्या मतदार बंधू- भगिनींनी निवडून दिले त्यांच्या सहकार्यासाठी काल, आज व कायम आपल्या सहकार्यासाठी सदैव राहणार आहे.
close