shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णा शहरातील राष्ट्रवादी नेत्याचा निधी आणून विकण्याचा धंदा?


पूर्णा:- शहरातील काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लातूर येथील एका मंत्र्याशी संधान साधून शहराच्या विकासासाठी निधी पाहिजे म्हणून लाखो रुपये फंड आणत आहेत आणि काम न करता ईतर पक्षाच्या नेत्यांना टक्केवारीने विकून टाकत असल्याची माहिती समोर येवू लागली आहे. 

शहरातील राष्ट्रवादीचे काही नेते गत काही दिवसापासून लातूर व मुंबई येथे मंत्रालयात जावून तेथे काही कांग्रेस पक्षाचे मंत्री यांच्याशी संधान साधून फंड आणित आहेत. आणि आणलेला फंड दुस-याच पक्षाच्या नेत्यांना टक्केवारीने विकत आहेत. या प्रकाराकडे फंड देणा-या मंत्र्यांना शुध्दा चकवा दिला जात आहे. लाखो रुपये फंड आणून शहराचा विकास न करता दुसऱ्या जणांना देवून टाकत असल्यामुळे करोडो रुपये वाया जात आहे. अशा धंद्यामुळे नेत्याची लाखो रुपये कमाई होते असल्याची माहिती जनता सांगत आहे.

सत्ताधारी यांनीही विकास मनावा तसा केला नाही. त्यामुळे लाखो रुपये कमाई करण्यात आली. तसच पूर्णा शहरात डांबरीकरण रस्ता करण्यात आला त्यात आईल मिसळ डांबर टाकले. त्यामुळे आता उन्हाळ्यात रोडवरील डांबर अतिशय पगळून रस्त्यावर चालने मुश्किल झाले आहे. मोटार सायकल सिलीप होवून माणसे पडत आहेत. या कामात गुत्तेदाराने लाखो रुपये भ्रष्टाचार केल्याचे उघड होत आहे.
close