shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावठी कट्टा व धारदार शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत एकत्रित जमलेल्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरूवार दिनांक १७ मार्च २०२२ 

गावठी कट्टा व धारदार शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत एकत्रित जमलेल्या आरोपींना कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद..!!
 
अहमदनगर : नगर शहरातील आगरकर मळा भागाजवळ गायके वस्ती शेजारी असणाऱ्या पुणे शिर्डी बायपास वरील उड्डाण पुलाच्या खाली कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी पिस्तूलासह तलवारी आणि धारदार हत्यारे जप्त केली आहेत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

      आगरकर मळा भागात एका टोळीकडे धारदार शस्त्रे असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांना समजली असता त्यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी सूचना केल्या असता पोसई.मनोज महाजन व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांच्या सह सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता पोलिसांना पाहून मोटार सायकल वर पळुन जात असताना पोलिसांनी पाठलाग करून सुनिलसिंग जितसींग जुन्नी वय २७ वर्ष २) आझाद लक्ष्मण शिंदे वय २३ वर्ष ३) शंकर अशोक पंडीत वय ३२वर्ष ४) सागर दिनेश बिनोडे वय २६ वर्ष ५) आकाश अगस्तीन आढाव वय २२ वर्ष सर्व रा संजयनगर काटवनखंडोबा अ नगर व ६) संतोष रमेश पंडीत वय २५ वर्ष रा सागर कॉम्पलेक्स आगरकर मळा स्टेशन रोड अ.नगर यांना पकडले मात्र या वेळी त्यांचे आणखीन दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
 पकडलेल्या आरोपींकडून ३५,४५०/- रु किंमतीचा गावठी बनावटीचा स्टीलचा कट्टा,एक मॅगझीन व १ जिवंत काडतुसे व ४५० रु कि.अंदाजे २) ९५,६५०/- रु अंदाजे किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या एक लोखंडी चाकु व रोख रक्कम, एक रेडकॉप नावाचा लाल मिर्ची पावडरचा स्प्रे बाँटल, कापडाच्या तुकड्यात गुंडाळलेली दोन लोखडी तलवार, लाकडी मुठ असलेले२ कोयते, २५० ग्रॅम वजणाची लाल रंगाची मिर्ची पावडर अशी शस्त्रे आणि दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

 
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे व गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज महाजन,पोना. गणेश धोत्रे , पोना.सलिम शेख , पोना.नितीन शिंदे, पोना.सागर पालवे, पोना. संतोष गोमसाळे, पोना.योगेश भिंगारदिवे, पोना. योगेश कवाष्टे, पोना. राजु शेख, पोकॉ.अभय कदम, पोकॉ.दिपक रोहकले, पोकॉ.सोमनाथ राउत, पोकॉ. अमोल गाढे, पोकॉ.अतुल काजळे,पोकॉ संदिप थोरात,पोकॉ.याकुब सय्यद यांनी केली आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close