shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजमधे होणार स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतीक सभागृह हारूनभाई इनामदार यांच्या प्रयत्नास यश..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :-
स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या विचारांवर प्रचंड प्रेम करणारे केज मधील जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार यांच्या प्रयत्नातुन केजमधील सध्या डीवायएसपी कार्यालय असलेली जागा आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची न राहता केज नगरपंचायतच्या मालकीची झाली आहे. त्या जागेची नगरपंचायतच्या मालमत्ता रजिस्टरला नोंद घेताना स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतीक सभागृह असी नोंद घेण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी लवकरच म़ुंडे साहेबांच्या नावाने भव्यदिव्य असे सांस्कृतीक सभागृह उभारले जाणार आहे.
         

याबाबत सविस्तर माहिती असी की, केज शहरातील सध्या डीवायएसपी कार्यालय असलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने नोंद होती. तसेच डीवायएसपी कार्यालयाचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चालू आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे लवकरच डीवायएसपी कार्यालय त्या ठिकाणी स्थलांतरीत होईल. डीवायएसपी कार्यालयाच्या सध्याच्या जागेवर स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सांस्कृतीक सभागृह व्हावे म्हणून त्यांच्यावर व त्यांच्या विचारांवर प्रचंड प्रेम करणारे त्यांचे चाहते असलेले हारुणभाई इनामदार यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आता रितसर नगरपंचायत च्या मालमत्ता रजिस्टर मध्ये याबाबत नोंद घेण्यात आली आहे. 


याबद्दल जनविकास परीवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा असलेले हारुणभाई इनामदार तसेच नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड आणि नगरसेवक व जनविकास आघडीच्या सर्व नेत्यांचे नाट्यप्रेमींनी  मनोमन आभार मानले आहेत.  स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यां जनतेतून या कार्याचे जोरदारपणे स्वागत केले जात आहे. लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे कळते.
close