shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवेंद्र फडणवीस यांना कलम १६० अन्वये बेकायदा नोटीस बजावल्या बद्दल इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त.

देवेंद्र फडणवीस यांना कलम १६० अन्वये बेकायदा नोटीस बजावल्या बद्दल इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिस स्टेशन समोर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना फौ. द. प्र. संहिता  कलम १६० अन्वये बेकायदा चौकशीची नोटीस बजावली म्हणून तीव्र निषेध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करून जोरदार घोषणा करीत इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना निवेदन पत्र सुपूर्त करण्यात आले.

 यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, काल दिनांक ११ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांना कलम 160 अन्वये नोटीस बजावली बी.के.सी. पोलीस ठाणे, पहिला मजला, सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग गु. शा. मुंबई यांचे कार्यालयात जबाब नोंद करणे कामी आज सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे अशी सहाय्यक उपायुक्त नितीन जाधव यांची नोटीस काल सकाळी आली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिक्रिया खूप तीव्र उमटवयास लागल्या. काल संध्याकाळी गृहखात्याच्या मंत्र्यांची आणि प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली आणि त्यांच्या लक्षात आले की. ही नोटीस आपण दिलेली आहे त्याचं काहीतरी वेगळा परिणाम होईल. चुकीचा पायंडा काहीतरी घडेल .त्यांनी काल परत निर्णय बदलला आणि सांगितले कि, आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाऊ आणि त्यांचा जबाब आम्ही घेऊ. निवासस्थानी गेले काय ? आणि बी.के.सी च्या सायबर विभागात गेले काय? मुळात ही अशा प्रकारची जबाब घेण्याच्या संदर्भातील काढलेली ही जी नोटीस आहे त्याचा पहिल्यांदा आम्ही सर्वजण तीव्र शब्दात धिक्कार करून निषेध व्यक्त करतो आणि आघाडी सरकारच्या दडपशाहीचा आणि शासनाचा दुरुपयोग करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे प्रकरण काय आहे हेच माहीत नाही .नोटीस का आली हे बर्‍याच लोकांना माहीत नाही.


कलम १६० अन्वये नोटीस काढून जाबजबाब घेऊन काहीतरी वेगळं षड्यंत्र रचून कदाचित भविष्यामध्ये अजून काय कायदेशीर करता येईल का? अशा प्रकारचे काय प्रयत्न आहे का? अशी सुद्धा शंका आज या माध्यमातून आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सभागृह चालू असताना काल बजेट मांडलं सभागृह परत सुरू होणार आहे. जे देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोपावर सरकार कडून उत्तर आलं नाही. काल कोणीतरी सरकारी वकील सांगतो स्टिंग ऑपरेशन आहे. चार दिवस कोण हा झोपला होता काय? त्याच्यावर एवढे मोठे आरोप झाल्यानंतर एका क्षणात प्रतिक्रिया दिली पाहिजे होते. याचा अर्थ असा आहे. फार मोठे षडयंत्र जाणून-बुजून हे सरकार विरोधी पक्षाचा संदर्भामध्ये करत आहे .उलट आपल्यावर आरोप केले जातात. जाणून बुजून आमच्या चौकशा लावतात. मुद्दाम केंद्रीय तपास यंत्रणा आमच्या मागावर लावतात. काही नाही जर तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरायचे कारण नाही. 

देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट दिलं .मी आजचे सर्व दौरे रद्द केले आहेत. जिथे मला पोलीस बोलतील तिथं मी जायला तयार आहे. जिथे माझा जबाब मागितला तिथं द्यायला तयार आहे. अख्खा दिवस पोलीस खात्याची वाट बघत बसतो. मला सांगा तिथे मी येतो. मला काळजी करायची कारण नाही .एखादी नोटीस आल्यानंतर विरोधी पक्ष नेता जर ही भूमिका घेत असेल तर तुम्हाला नोटीस आल्यानंतर दुसरी भूमिका का घेता? मी या सगळ्या प्रकरणांमध्ये निश्चित प्रमाणे या सरकार मधल्या काही लोकांचं षड्यंत्र आहे.

 आत्ताच झालेल्या चार राज्यातले निकाल यामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश आणि होणाऱ्या भविष्यकाळातल्या निवडणुका आणि आजच महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर हे अनैसर्गिक पणाने स्थापन झालेले राज्य सरकार आहे. त्यांच्या विरोधा मध्ये आक्रोश जनतेमध्ये निर्माण झालेले आहे. म्हणून आज इंदापूर पोलिस स्टेशन समोर आलेलो आहे. त्या नोटिसांची होळी करणार होतो यामध्ये राजमुद्रा सह लेटर असल्याने आम्ही एक निवेदन तयार केले आहे. ते निवेदन पोलिस अधिकाऱ्यांना देऊन राज्य सरकारचा गृह विभागाचा अशा नोटिसा च्या प्रकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो. हे जर नाही थांबलं तर ही सुरुवात आहे. पुढच्या काळात मोठ्या आंदोलनाचा भाग आहे. अखेर राज्य निश्चित पणाने देवेंद्र फडणीस यांच्या मागे उभा राहणार आहे. यानिमित्ताने सांगायचे आहे. असे मत माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदिपान पडवळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
close