पूर्णा/प्रतिनिधी: - येथील शिवारात असलेल्या बळीराजा साखर कारखाना साईटवर विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि १४ मार्च सोमवार रोजी दुपारी १२ वाजता रास्ता रोको भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी, शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीने पर जिल्ह्यातून येणारा ऊस तात्काळ बंद करुन कार्यक्षेत्रातील ऊस गाळपासाठी स्विकारण्यात यावा, ऊस लागवड नोंद विनाअट घेण्यात यावी, १५० टनाची अट तात्काळ बंद करण्यात यावी.
एफ आर पी कायद्याप्रमाणे १४ दिवसात ऊसाचे बिल अदा करण्यात यावे, वरील मागण्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी मान्य न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना या पेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहे याची जिल्हा अधिकारी यांनी घ्यावी या मागणीसाठी भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश पोपळे, हनुमान राजेगोरे, रावसाहेब पाटील अडकिणे, किशोर ढगे, किसनराव कदम, भगवान शिंदे, गजानन तूरे, दिगंबर पवार, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोंडे, रामप्रसाद गमे, पंडित भोसले, शेख जाफर, जयवंत कुंडगीर, रामभाऊ आवरंगड, शेषराव शेळके आदी सह असंख्य उपस्थित होते. सदर निवेदन भाषणानंतर नायब तहसीलदार नितीशकुमार बोलोलू यांना दिले तसेच मोर्चा मध्ये निवेदनाचा उपयोग नाही झाला जिल्हा भरात नांदेड रोड, झिरो रोड, ताडकळस रोड व रेल्वे रोकण्यात येणार असल्याचे माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश पोपळे यांनी दिली. जळावू ऊस आणित असून चांगला ऊस नेत नाहीत तसेच २५ हजार रुपये शेअर्स ची अट टाकली जात आहे.
यामुळे गरीब शेतकरी वंचित राहत आहेत. वेळेवर गरीब शेतक-याचा ऊस न नेता राजकीय नेत्याच्या दबावाखाली कुणाचेही ऊस नेला जातो. आणि शेतकी कर्मचारी चिरीमिरी घेऊन जुने खोडवे ऊस गाळपासाठी नेत आहेत. बळीराजा साखर कारखाना अध्यक्ष यांची वचक नसल्याने कर्मचारी मनमानी चालवत आहेत. असी ओरड यावेळी शेतकरी करत होते.

