नीरा भीमा' कारखान्यावरती शंकररावजी पाटील यांना अभिवादन.
फोटो:- नीरा भीमा कारखान्यावरती शंकररावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार.
इंदापूर :प्रतिनिधी दि.1/3/21
शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व मान्यवरांनी मंगळवारी (दि.1) अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी दत्तूअण्णा सवासे, दादासाहेब घोगरे, मच्छिद्र वीर, भागवत गोरे, तानाजीराव नाईक, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
_____________________________

