दापोडी:- दापोडी ,येथील श्रीमती. सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यतिथीस विनम्र अभिवादन करण्यात आले.जनता शिक्षण संस्थेच्या गोयल महाविद्यालयात सावित्रीबाईच्या स्मृतिदिनानिमित्त १० मार्च रोजी सकाळी११:००वाजताअभिवादन करण्यात आले.
सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी , श्री. गोरक्ष ब्राह्मणे(सामाजिक कार्यकर्ते) हस्तेकरुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री. गोरक्ष ब्राह्मणे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याविषयी विषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक/ प्राध्यापक्तेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे (राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख) प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. सोमनाथ दडस, सुरेखा हारपुडे,प्रा. अमरदीप गुरमे, प्रा. वसंत साळुंके, प्रा. वैभव वरडुले, प्रा. उत्तमगोरड, प्रा. विनोद डिके, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. ज्योती लेकुले, श्री. लक्ष्मण कोहिणकर, श्री काताराम खामकर, श्री. लक्ष्मण मुरकुटे, श्री हनुमंत गायकवाड, सौ वंदना दळवी, नंदा काशीद, मंदाकिनी आढाव, निलम सोनवणे श्री.कपिल कांबळे हे उपस्थित होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

