shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी -प्रा. दिलीप जाधव



सांगली । दि.२७ :  मराठी भाषा ही आत्म्याची भाषा असून तिच्या विकास आणि संवर्धनाची गरज आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा दिलीप जाधव यांनी केले. 

         जत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी राजभाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त जत तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे वतीने शिक्षक परिसंवादात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
       प्रा. जाधव म्हणाले, मराठी साहित्य काळानुरूप कात टाकत पुढे चालत आहे. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. मराठी साहित्याला  विशाल परंपरा असून   जात्यावरच्या  ओवीपासून ते आजच्या काळात लेखन करणारे नवोदित  यांनी ही दिंडी पुढे नेली आहे. इंग्रजी भाषा आणि साहित्याची जागतिक पातळीवर जशी नोंद घेतली जाते तशी मराठी भाषेच्या भल्यासाठी  संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.प्रमुख पाहुणे म्हणून कवी लवकुमार मुळे यांनी  संघटनेची गरज आणि संवर्धन याची मांडणी करून आपल्या सुमधूर आवाजात काव्यगायन केले.

       प्रास्ताविक प्रा. व्ही .पी .कुलकर्णी यांनी तर मान्यवरांचा परिचय प्रा माणिक कोडग यांनी करुन दिला. कार्यक्रमास प्रा.सुनिल गवारी, लेखक मच्छिंद्र ऐनापुरे, पर्यवेक्षक ए. टी.धायगोडे,प्रा.सौ.दिपिका  बाबर, प्रमोद  मेटकरी, प्रा. एस.एस. बाबर, प्रा. अरुण पाटील, सौ. स्मिता कुलकर्णी, संदिप पाटील, आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे यांनी तर आभार प्रा. पी. व्ही. वठारे यांनी मानले.
close