प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
मल्हार सेना प्रणित राजे मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळ्याचे माजलगावात होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले असून या वर्षी च्या राजे मल्हारराव होळकर सामाजिक राज्यस्तरीय पुरस्काराचे रामनाथ पिराजी मंडलिक मानकरी आहेत.
मल्हार सेना प्रणित राजे मल्हारराव होळकर जन्मोत्सवाचे माजलगावात या वर्षीचे ११ वर्षे असुन दि.२७ मार्च २०२२ रविवार रोजी सांयकाळी ६ वाजता राजे मल्हारराव होळकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.तर उदघाटक म्हणून भाजपाचे नेते रमेशराव आडसकर आणि विशेष उपस्थिती म्हणून आ.प्रकाश दादा सोंळके राहाणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक तुकाराम येवले हे भुषवणार आहेत.
तर विशेष अतिथी म्हणून माजी आ.आर टी देशमुख,माजी राधाकृष्ण होके पाटील, बहुजन नेते बाबुराव पोटभरे,मुंबई बाजार समितीचे सभापती अशोकराव डक,शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमुख आप्पासाहेब जाधव,सभापती कल्याणराव आबुज,माजी जि.प.सदस्य बबनराव सरवदे, नितीन नाईकनवरे, शेख मंजुर, सहाल चाऊस,अरूण राऊत, डॉ अशोक तिडके,अंकुश निर्मळ,सभापती संभाजी शेजुळ, अमर डोणे,प्रा.प्रकाश गवते,उमेश मोगरेकर, डॉ. भगवान सरवदे,सतिष सोंळके, बाळासाहेब सोनसळे,डॉ. भारत वाघमोडे, संतोष देवकते, आण्णासाहेब वगरे,प्रा.लक्ष्मीकांत सोन्नर,ज्ञानेश्वर सरवदे,शामसुंदर पांचाळ, सुनील खंडागळे, बंडु खांडेकर, राजेश घोडे,डॉ युवराज कोल्हे,रंजीत करांडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
अशी माहिती संयोजक विलास नेमाणे, अशोक डोणे, जयंती अध्यक्ष सुभाष गवळी,प्रभाकर धरपडे, दता मुळे,बाबा वगरे,प्रविण गवते, विकास आबुज, अशोक अर्जुन यांनी दिली आहे.

