राजगुरूनगर ( पुणे ) : पर्यावरण संवर्धनावर काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर मंचच्या प्रदेश अध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील कडूस ( ता. खेड ) येथील रानमळा पॅटर्नचे प्रणेते, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी आदर्श सरपंच पोपटराव तुकाराम उर्फ पी. टी. शिंदे गुरुजी, तर सचिवपदी राजन जांभळे (राजगुरूनगर) यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक किरणशेठ मांजरे ( चाकण ) आणि खराबवाडीचे माजी उपसरपंच व नवमहाराष्ट्र विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील नाना शंकर पाटील ( भुसावळ ) यांची कार्याध्यक्ष, तर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेश संपर्क प्रमुख विनोद महाळुंकर ( महाळुंगे इंगळे ) यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळ ( राजगुरूनगर ) यांची सहसचिवपदी, तर प्रदेश प्रवक्ते पदी सकाळचे जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील ( मंचर, ता. आंबेगाव ) व पत्रकार हनुमंत देवकर ( खराबवाडी, चाकण ) यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारी सदस्यपदी शिवनेरी मिसळचे संचालक व दौंड तालुक्यातील मिरवडी गावचे सरपंच सागर शेलार, चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती राजेश धोटकर, भुसावळ तालुक्यातील सुरेंद्रसिंग गोविंदसिंग पाटील व राजगुरूनगर येथील उर्मिला एकनाथ सांडभोर यांची निवड करण्यात आली आहे.
0000

