shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ४ वर मालगाडीचा अड्डा, प्रवाशांना नाहक त्रास..!आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पत्राला केराची टोपली..?

पूर्णा (सय्यद कलीम): - येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ४ वर गेल्या अनेक महिन्यापासून मालगाडी थांबवली जाते. या प्लॅटफॉर्म वर प्रवासी थांबा आहे. त्यामुळे मालगाडी मुळे दादर चढून १ ते ३ फ्लॅट फार्मवर प्रवासी गाडी थांबवली जाते. त्यामुळे दाद-यावरुन वृध्द व्यक्ती, व आजारी प्रवासी यांना दादर चढून दम येत आहे. ४ नंबरवर मालगाडी थांबवली जात आहे. सकाळी ८ ते १० पर्यंत मालगाडी थांबवली जात आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  

       आमदार रत्नाकर गुट्टे

दमरेचे व्यवस्थापक यांना गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी निवेदन दिले आहे की, ४ नंबरवरील मालगाडी हटविण्याचे निवेदन दिले होते. परंतु डिआर एम यांनी लक्ष दिले नाही. रेल्वेचा असा नियम आहे की, रेल्वे स्थानकाच्या ज्या बाजूने शहर आहे त्या बाजूने प्रवासी गाड्या थांबवणे, मात्र तसे होत नाही. एडीआरम, स्टेशन मास्टर, यांना हाताशी धरून 1 ते ३ नंबरवर गाड्या लावल्या जातात.कॅंटीनचे ठेकेदार मात्र अधिकारी यांना पैसे देऊन गाड्या 1 ते 3 वर थांबवली जाते का? असा प्रश्न आहे. 50 ते 60 हाॅकर बेकायदेशीर खाद्यपदार्थ विकतात. पण कार्यवाही केली जात नाही. आरपीएफ त्यांना मदत करीत असतात का? असा ही सवाल आहे.  आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या निवेदनाकडे कोण लक्ष देणार? असा सवालही विचारला जात आहे.
close