shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौं. सुमनबाई सोपानराव जगताप : एक कर्तृत्ववान पर्व...!

सौं. सुमनबाई सोपानराव जगताप : एक कर्तृत्ववान पर्व..

काळाचा महिमा काळचं जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे.
आजही घुमातात स्वर तुझे कानी,
बाई वाहताना श्रद्धांजली येते आमच्या डोळ्यात पाणी..

शिर्डी नगरचे माजी उप सरपंच श्री सोपानराव राघूजी जगताप पा. यांच्या सुविद्य पत्नी सौं. सुमनबाई जगताप यांचे दि १६ मार्च २०२२ रोजी वृद्धापकाळानें निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे, असा भरलेला परिवार आहे. तळेगाव दिघे येथील दिघ्यांची कन्या त्यांचा विवाह शिर्डीतील प्रथितयश जगताप पाटील सून म्हणून आल्या..

 श्री सोपानराव जगताप हें शिर्डी गावाचे प्रतिष्ठित नागरिक म्हणून सर्वांना परिचित आहे. सोपानराव हें सर्वत्र नाना म्हणून ओळखले जातं. श्री सोपानराव यांनी मोठ्या कष्टाने परिवाराची जडणघडण केली, त्यात सुमनबाईंचा ही मोठा वाटा आहे...

श्री सोपानराव जगताप हें श्री साईबाबा संस्थान मध्ये सुरवातीच्या काळात एक रुपया रोज याप्रमाणे श्री साईंच्या सेवेत रुजू झाले, अतिशय प्रतीकुल परिस्थितीत सुमनबाईंनी श्री सोपानराव जगताप यांचा संसार सांभाळत त्यांना खंबीर अशी साथ दिली. त्याकाळी शिर्डीची पायाभरनी सुरु झाली, श्री सोपानराव जगताप हें मुळातच मितभाषी सुस्वभावी असल्याने ते शिर्डी ग्रामपंचायतची सरपंच म्हणून जवाबदारी त्यांच्यावर आली, श्री साईबाबा संस्थान नौकरी, ग्रामपंचायतचे राजकारण व समाजकारण याकडे लक्ष देतांना सुमनबाईंनी कुटुंबाची सरस्वी जवाबदारी ही स्वतःवर घेतली...
परिवार घडवतांना मुलांना उच्य शिक्षित केले, सर्वांना शांत स्वभावाचे परिचित असे जेष्ठ चिरंजीव श्री दत्तात्रय जगताप यांना व द्वितीय चिरंजीव श्री राजेंद्र जगताप यांना श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी झाले. श्री राजेंद्र जगताप पा. हें श्री साईबाबा कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थान चे प्रशासकीय अधिकारी झाले. तृतीय चिरंजीव हें शिर्डी नगरपंचयतीचे उपनगराध्यक्ष व शिर्डीतील आर्थिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली श्री साई प्रेरणा पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहे...
तसेच त्यांच्या सुनबाई व विजयराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी ह्या सौं. अनिताताई जगताप या शिर्डीच्या नगराध्यक्षा होत. त्यांच्याच काळात शिर्डीला स्वच्छ व सुंदर शिर्डीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते..
सुमनबाईंचे चौथे चिरंजीव श्री प्रकाश सोपानराव जगताप हें शहरातील प्रतितायश व्यापारी आहे. मुलगी सौं मीराबाई निर्मळ ह्या ही पिंप्री-निर्मळ या गावाच्या ग्रामपंचायत सदस्या आहे..
सौं सुमनबाई सोपानराव जगताप यांच्या पश्चात चार मुले, चार सुना मुलगी, जावई, उच्य शिक्षित नातवंडे व त्यांच्या नातसून असा मोठा परिवार आहे..

सौं. सुमनबाई जगताप यांच्या जाण्याने जगताप परिवाराची मोठी हानी झाली आहे. आपल्या कष्टकरी व समर्थ स्वभावाने त्यांनी जगताप परिवाराचा भक्कम पाया भरला. सर्व कुटूंबियांना आपल्या पायावर उभे करून दिले. 
सुमनबाईंच्या जाण्याने जगताप पाटील परिवार आज खऱ्या अर्थाने आईचा मायेला पोरका झाला आहे. अश्या या ईश्वर स्वरूप आईस अतिशय जड अंतकरनानें शब्दरूपी भावपुर्ण सुमंजली..

दशक्रिया विधी 
शुक्रवार दि : 25/03/2022 रोजी सकाळी :09 वा.
ठिकाण : श्रीकृष्ण मंदिर, नांदूर्खी पाट, येथे होईल.

शब्दांकन :
श्री किशोर सुर्वे.
श्री स्वानंद (भैय्या) रासने.
close