जावेद शेख । प्रतिनिधी :-
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना चे संस्थापक अध्यक्ष मा श्री दिपक कांबळे व मुख्य महासचिव श्री कमलेश शेवाळे देवा यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी शरीफ बागवान जळगाव येथील अमर रोटी फाउंडेशन बाबां विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच अन्याय अत्याचार विरोधी समिती जिल्हा अध्यक्ष एबीसीएफ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व पत्रकार विविध संस्था संघटनेत सक्रिय सामाजिक कार्यकर्ते शरीफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल अहमदनगर येथे प्रदेश कार्यकारिणी ची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक उमेश काशीकर यांच्या शिफारशीनुसार शरीफ बागवान यांची निवड करण्यात आली यावेळी प्रदेश सचिव सौ श्वेता व्हनमाने, संपर्कप्रमुख भरतजी नजन, धनश्री उत्पात, प्रदेश उपाध्यक्ष निजाम पटेल, वजीर शेख, समन्वयक रमेश जोशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे गुरु यांची उपस्थिती होती.
शरीफ बागवान यांनी निवड झाल्यानंतर सांगितले की आपण लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दौरा करणार असून आपली स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना प्रत्येक तालुक्यात व गावात स्थापन करुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु. आणि प्रत्येक तालुक्यात मजबूत संघटन करु व लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करुन समाजाची सेवा करुन समाजाला सहकार्य करु. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शरीफ बागवान यांचे अभिनंदन केले. या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी निवड झाल्याने नाझीम निसार एडवोकेट भूषण सूर्यवंशी समीर सलीम फरान शरीफ जावेद अली पाटील डॉक्टर संजय जैन एडवोकेट समाधान पाटील डॉक्टर नितीन सपकाळे रमाकांत कदम योगेश वाणी डॉक्टर महाजन खान इतर मित्र परिवार तर्फे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला जात आहे व संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक होत आहे जळगांव जिल्ह्य़ातुन सर्वच स्तरांतून त्यांच्या निवडीचे कौतुक होत आहे.

