प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
गुंडेगाव : २० / जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजे निमित्ताने गुंडेगाव येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या निमित्ताने गावातील रामेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज बीच साजरी करण्यात आली.
फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठगमन केले तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. तळागाळातील लोकांनाही सहज समजतील अशा संत रचना तुकाराम महाराजांनी केल्या आहेत.बीजेनिमित्त सतरा दिवस मच्छिंद्र महाराज भापकर यांनी तुकाराम चरित्राचे वाचन केले होते .
यावेळी आज बीजे निमित्ताने हा.भ.प. चंद्रकांत दहातोंडे महाराज यांचे किर्तन आयोजित केले होते.यावेळी भावीक किर्तनात रंगुन गेले होते.या कार्यक्रमासाठी गावातील पुजारी अनिल पवार, महामुनी गुरुजी,ही.भ.प.साहेबराव भापकर,बनपिंपरीकर महाराज,नामदेव कोतकर, नारायण बैरागी,वामन निकम,विजय भोसले महाराज, पारुबाई ढवळे,रत्न कपिले, सुंदराबाई लिंभोरे,यांनी कार्यक्रमासाठी श्रम घेतले असता अन्नदान व महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.

