shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरीचे पुरस्कार प्रेरणादायी--पंकज कुमावत..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
पोलीससेवा  जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. 


केज रोटरीने माझ्या कार्याची दखल घेऊन दिलेला "जनतेचा अधिकारी"  हा पुरस्कार अत्यंत प्रेरणादायी असून आपल्या पुढील पोलीस सेवाकाळासाठी हा पुरस्कार स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा केजचे विभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असणारे आयपीएस पंकज कुमावत यांनी केज रोटरीने दिलेल्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. येथील श्रीराम मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज रोटरीच्या माजी अध्यक्षा तथा नगराध्यक्षा सीता बनसोड या होत्या तर विचारपीठावर नायब तहसीलदार सचिन देशपांडे, केज रोटरीचे अध्यक्ष बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले उपस्थित होते. याशिवाय केज मसाप चे अध्यक्ष राहुल गदळे, विनोद गुंड पाटील, पत्रकार विजय आरकडे, अशोक सोनवणे गौतम बचुटे, बाळू गाढवे, राजू इनामदार, बाळासाहेब यादव यांची विशेष उपस्थिती होती.


आपल्या विशेष प्रशिक्षण कालावधीत पंकज कुमावत यांनी केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर गेली कांही महिन्यात बीड जिल्हा व बाहेर अनेक मोठ्या अवैध प्रकरणावर कठोर कार्यवाही करण्याचा धडाका लावला आहे. 

यामुळे गुन्हेगारी वर वचक बसला असून अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे. एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी जनतेच्या मनात किती मोठ्या आशा जागवू शकतो हे पंकज कुमावत यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे केजचे नांव जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर घेतले जाऊ लागले. त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेऊन केज रोटरीने त्यांना *"केज भूषण-जनतेचा अधिकारी"* गौरवपत्र देऊन सन्मानित केले आहे.

आपल्या मनोगतातून पंकज कुमावत यांनी आपल्याला मिळालेल्या पोलीस सेवा संधीला आपण संपूर्ण प्रामाणिकपणा, निःपक्षपातीपणा तसेच निष्ठा, समर्पित भावनेने कार्यरत राहून पुढे जाणार असल्याचे म्हटले. जनता व पोलीस यांचे नाते महत्वाचे असून जनतेची साथ मिळाल्यास अनेक गुन्हे उघड होण्यास मदत मिळते. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनतेने  आपापल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे असेही ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो हनुमंत भोसले यांनी केले तर आभार सचिव अरुण अंजाण यांनी मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, महेश जाजू, डी एस साखरे, दादा जमाले पाटील, संतोष पिलाजी, भीमराव लोखंडे, श्रीराम शेटे, सत्यवान राऊत,  बापूराव वाळके, डॉ दिनकर राऊत, धनराज पुरी, प्रकाश कामाजी, विजय जॅकेटीया या केज रोटरी सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close