shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समितीच्यावतीने शिक्षक भारती इंदापूराच्या नुतन पदाधीकारी यांचा सत्कार संपन्न.



शिक्षक समितीच्यावतीने शिक्षक भारती इंदापूराच्या नुतन पदाधीकारी यांचा  सत्कार संपन्न.

शिक्षक पतसंस्था व शिक्षक समितीने केलेल्या सहकार्यामुळे अर्थिक उन्नतीस हातभार - सतिश शिंदे अध्यक्ष शिक्षक भारती.
इंदापूर प्रतिनिधी:दि १ रोजी इंदापूर येथे शिक्षक समिती यांचे वतीने शिक्षक भारती संघटनेचे नुतन पदाधिकारी यांचा शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल , शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन वसंत फलफले , नितिन वाघमोडे , सुनिल शिंदे , विलास शिंदे , मोहन भगत , शफिक शेख , सिद्धार्थ चव्हाण , विनय मखरे , अरूण मिरगणे , नजीर शिकीलकर , सतिश खटके , सुनिल कोकाटे यांचे हस्ते फेटा , पुष्पहार , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक भारतीचे नुतन अध्यक्ष सतिश शिंदे म्हणाले शिक्षक पतसंस्थेत सभासद करून तात्काळ कर्ज उपलब्ध करून आर्थिक भरभराटीस शिक्षक पतसंस्था व शिक्षक समितीचे फार मोठे सहकार्यलाभले. शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल , शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव काळेल यांनी मनोगते व्यक्त केली.
शिक्षक भारतीचे नुतन पदाधिकारी अध्यक्ष सतिश शिंदे , तुकाराम भोसले , पै सहदेव काळेल , संतोष साबळे , सचिन गुरव ,  सतिश राऊत , राजकुमार तरंगे , संदिप नवले , संतोष चोरमले , आण्णा पवार , सुनिल पवार यांचे सह शिक्षक समितीचे वामन गायकवाड , स्वप्नाल धस , बापू आदलिंग ,  शहाजी पोफळे , सुरेश धारूरकर , किरण लंगोटे , संजीवकुमार केसरे , भालचंद्र भोसले , सर्जेराव खुसपे , अरूण मस्तुद उपस्थित होते. सुञसंचालन माजी सचिव छगन मुलाणी यांनी केले.

close