वांबोरी । प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यातील वांबोरीत, ग्रामस्थांना गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायत पाणी विभागाकडून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने वांबोरीमध्ये नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. सात दिवसात एकच दिवस तेही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी पिण्यासाठी आणि स्वच्छतेची सुद्धा गरज भागत नसल्याने गावात अनेक साथीचे आजारांना आमंत्रण मिळत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरल्याने आर्थिक तोटा होऊन, नागरिकांवर मानसिक ताण पडत आहे.
गेल्या दोन वर्षात कोवीड आजाराने अनेकांचे प्राण घेऊन अनेकांना पोरके करत संसार उघड्यावर आणला.
त्यातच वांबोरी ग्रामपंचायतने वार्षिक पाणीपट्टी वाढवून रुपये १८००/- केले आहे. पाणी पुरवठा सुरळीतपणे कमीत कमी दिवसाआड पुर्ण दाबाने मिळणे अपेक्षित असताना दरवर्षी लाखो रुपये पाईपलाईन दुरुस्ती, मोटार दुरुस्ती, डिझेल खर्च, पाईप खर्च, वीज बिल एक ना अनेक खर्च कागदोपत्री दाखवून देखील पाणी पुरवठा अखंडीतपणे गावकऱ्यांना वांबोरी ग्रामपंचायत देऊ शकत नाही हे वांबोरीकरांचे दुर्भाग्यच समजा! आणि जनतेच्या कर स्वरूप पैशांचा दुरुउपयोग होत आहे असे बोलले तर वावगे ठरणार नाही..!
ग्रामपंचायतने सुरळीतपणे पाणी पुरवठा करु न शकल्यास, पाणीपट्टी कमी करावी, सदर विषय पुढील ग्रामसभेमध्ये सामाविष्ट करून सर्वांनुमते ठराव मंजूर करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी उपमुख्य कार्यकारी जि.प.अहमदनगर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर राधेश्याम कसमुडे, काँ. सुनिल दुधाडे, गोरख देवकर, अवि थोरात, जुबेर शेख, राजू शेख, मारुती देवकर, सुनिल कुसमुडे, दत्तात्रय वाघमारे, पंढरीनाथ धनवडे, अनिल शेंडगे, भगवान सत्रे, राजेंद्र व्यवहारे आदींच्या सह्या आहेत.

