shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी - हर्षवर्धन पाटील.

नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी - हर्षवर्धन पाटील.

बाभूळगाव येथे अमोलराजे इंगळे व त्यांचे सहकारी मित्र यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव विविध कार्यक्रमानी संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:आज आपल्या सगळ्यांच्या समोर नव्या पिढीसमोर प्रश्न आहे की,आदर्श घ्यायचा कोणाचा? मी आपल्याला अभिमानाने सांगेन, आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करा. आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही असे मत बाभूळगाव येथे शिवजयंती उत्सव २०२२ आयोजित भव्य व्याख्यान व किर्तन ,पोवाडा सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
 तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी,  भास्कर गूरगुडे, सरपंच प्रतिनिधी जावळे,महेंद्र  रेडके महेश जगदाळे, अमर जगदाळे, स्वामीराज उद्योग समूहाचे मालक आबासाहेब पाटील , नानासाहेब खरात,मोहन खाबाले ,शेखर पाटील, रेडा गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब देवकर, धनंजय गायकवाड, राहुल साळुंके ,राजेंद्र पवार इत्यादी उपस्थित होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आज महापुरुषांचे असलेले प्रतिमा पाहतोय ही महाराष्ट्र आणि देशाची संस्कृती आहे. ज्यांनी महाराष्ट्र व देश उभा केला स्वातंत्र्य काळापासूनचा लढा दिला. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यातून जाऊन ३९१ वर्ष झालेली आहेत. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात गेला तर एकच राजाचे नाव निघते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते याचा रास्त अभिमान वाटतो. या कार्यक्रमात कु. स्नेहा इंगळे यांनी शिवाजी महाराजांचा बालपण सांगण्याचा प्रयत्न केला. स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी लहानपणापासून स्वीकारलं फक्त पन्नास वर्षाच्या काळामध्ये दोनशेपेक्षा अधिक किल्ले महाराष्ट्रापासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत त्या कालखंडामध्ये  मिळवले. मोघलांची फौज लाखोच्या संख्येत होती तर शिवाजी महाराजांकडे मुठभर मावळे होते. बारा बलुतेदार आणि गोर गरीब माणसं बरोबर घेऊन जिवाभावाची विश्वासाची माणसे तयार केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील गुण गोष्टी सांगताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पन्नास वर्षे जगून सगळ्या विश्‍वात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कर्तुत्वान, शूरतेचा, समानतेचा ,अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडण्याचा आणि गोर गरीब लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची भूमिका निर्माण करणारा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आज आपल्या सगळ्यांच्या समोर नव्या पिढीसमोर प्रश्न आहे की,आदर्श घ्यायचा कोणाचा? मी आपल्याला अभिमानाने सांगेन, आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करा. आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. आज एक युगपुरुष यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेल्या आहोत. अमोल इंगळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो कारण म्हणजे शिवजयंती हा एक उत्सव आहे. प्रेरणा देणारा शक्ती देणारा उत्सव आहे .इतिहासाचा अवलोकन करणारा उत्सव आहे .शिवजयंती म्हणजे लोकांच्या मनामध्ये रक्त सळसळणारा उत्सव आज आनंदाचा दिवस आहे.

 या कार्यक्रमात युवा उद्योजक अमोल राजे इंगळे यांनी प्रास्ताविक केले तर कु. स्नेहा इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना घोड्यावरती बसून हलगीच्या निनादात मध्ये कार्यक्रम स्थळापर्यंत मिरवणूक काढली आणि औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

शिवजयंती उत्सव मंडळ बाभूळगाव २०२२ यांनी कु. स्नेहा इंगळे  चे व्याख्यान तसेच कुमारी जानवी गुरव यांचा पोवाडा हरिभक्त पारायण वैष्णवीताई धायगुडे यांचे हरी किर्तन व मृदुंग आचार्य संग्राम उंबरे बीडसिंगे यांचे मृदंग वादन अशा या कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक अमोलराजे इंगळे व त्यांचे सहकारी मित्र परिवार यांनी आयोजित केला होता.
close