shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणी कितीही सम्राट बनला तरी काळाच्या ओघात ते ऐश्वर्य लयाला जाते. - दत्ता कडू पाटील

देवळाली प्रवरा - १५ मार्च  :-
देवळाली प्रवरा येथील माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी आज त्यांच्या fb गावगाडा सदरात म्हंटले आहे की, कोणी कितीही सम्राट बनला तरी  काळाच्या ओघात ते ऐश्वर्य लयाला जाते.

        गावगाडा लिहताना कडू पाटील लिहतात की, आज गांवगाडा सकाळपासुन व्यस्त राहिला. आज देवळाली प्रवरा पाटबंधारे कार्यालयास भेट दिली. तशी मागच्या आठवड्यात आम्ही पाटपाण्यांबाबत काही गोष्टींचा उहापोह गांवगाड्यात केला होता देवळाली प्रवराचे हक्काचे पाणी. ते मिळण्यासाठी येणा-या अडचणी. सध्या अस्तीत्वात असलेली पाटबंधारे यंत्रणा तसेच पाणीवाटप संस्था , त्यापुढील अडचणी. चा-यांच्या विशेष दुरुस्ती यावर चर्चा केली. 



देवळालीकरांनो तुम्हांला आज पाण्याची अडचण जाणवत नाही. परंतु निळवंडे प्रकल्प कार्यान्वीत झाल्यावर तुम्हांला त्याचे आज मिळणारे पाणी भविष्यात मिळणार नाही. त्यावेळी खरी अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी आत्ता काळाची पाऊले ओळखुन काम करावे लागणार आहे. या विभागाचा अस्मादिकांस चांगला अनुभव असल्याने हे प्रश्न कसे मार्गी लावता येतील, याची पुर्ण कल्पना आहे.  

      नगरपरिषदेची वार्ड व प्रभाग रचना शासन आदेशाने रद्द झाली. नव्याने जेव्हा निवडणुक होईल. अथवा या कायद्यांस कोर्टाने नाकारले तर निवडणुक होईल. काहीही उलटसुलट झाले तरी कमीत कमी ३ महिने हि निवडणुक होत नाही.  प्रभाग रचनेबद्दल जनतेत प्रचंड रोष आहे.प्रशासनाने कमरेचे सोडुन डोक्याला बांधत खुप विचित्र प्रभाग रचना बनवली आहे.

आज आमचे काही सहकारी नगरपरिषदेत प्रभाग रचनेच्या अनुषंगाने माहिती मागण्यांस गेले असता प्रशासनाची भुमीका अत्यंत असहकाराची वाटली. तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेवुन त्यांचे एकंदरीत वर्तन जिल्हाधिकारी महोदयांना लेखी सादर केले. आता तुमच्या लक्षात हि चलाखी आली आहे. नियतीला ती मान्य नसावी म्हणुन हि प्रभाग रचना मोडीत निघाली. नवी प्रभाग रचना जेंव्हा बनेल तेंव्हा सावध रहा. कदाचित हे तोपर्यत राहिले तर हिच प्रशासकिय मंडळी राहिल तर हिच रचना पुढे रेटतील. त्यावेळी कसा रेटा द्यायचा ते तुम्ही ठरवा. 

       आता पुढचे काही महिने नगरपरिषद निवडणुकां हा विषय बाजुला ठेवा. आम्ही तुम्हांस सांगितले होते कि आम्ही नगरपरिषदेची एकंदरीत कार्यपध्दती न् खर्चाची माहिती तुम्हांस सांगु. ह्या काही महिन्यांत आपल्याला हे विकासकामांचे खोदकाम करत वास्तव समोर आणायचे आहे. आम्ही सर्व जंत्री तयार केली आहे. वेळ येताच
 ती कोठे द्यायची न् कुठे वापरायची आम्हांस चांगले ठाऊक आहे. पुढच्या आठवड्यात याबाबत तीव्र भुमीका घेत हे विषय ऐरणीवर आणणार आहोत. त्यातुन लोणी बाहेर येते कि दही. कि ते दुध फाटून त्याचे ताक बनते. ये आनेवाला समय बतायेगा.   

      आज अहमदनगरला व्याहीबुवांकडे गेलो. सोबत शिवाजी घाडगे न् आप्पासाहेब होते. आमचे व्याही हे खुप जेष्ठ पत्रकार आहेत. ते आता मराठवाडा साथी या पेपरचे अहमदनगर निवासी संपादक आहेत. शिवाजीराजे न् त्यांची गप्पांची छान मैफील जमली.नंतर सहज पाठीमागे चालत गेलो. तर तिथे निजामशाहीच्या संस्थापकांचे  अहमदशहा बादशहाची कबर व त्यावरील मकबरा दृष्टीस पडला. तेथे जावुन पहाणी केली. किती अप्रतीम जागा न् इमारत. पुरातत्व विभागाने ती ताब्यात घेतलेली.या अहमद बादशहाच्या नावाने अहमदनगर हे नांव रुढ झाले. 

कधीकाळी या भागाचा एकप्रकारे अनभिषिक्त सम्राट असलेला अहमदशहाची कबर अज्ञातवासात विराण वातावरण अनुभवत आहे. कोण किती सम्राट असेल. परंतु काळाच्या ओघात ते ऐश्वर्य लयाला जाते. हे तेथील दृश्य पाहुन वाटले. एकदा सहज भेट द्या न् पहा ते भंगलेले साम्राज्य न त्याच्या खुणा. 
#गांवगाडा#
close