shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानवी अस्तित्वाची हिच खरी ओळख..!!

उद्दिष्ट महत्वाचे....


हा फोटो आहे एका टोमॅटो च्या झाडाचा, कोणीतरी एखाद्या प्रवासी यात्रेकरुंने या टोमॅटो चे बी (बिज) धावत्या रेल्वेतून फेकले असेल.

हे झाड माती सारुन नाहीतर काळे पाषाण दगड भेदून बाहेर आले आहे, जेव्हा हे झाड लहान होते. तेव्हा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रेन या झाडाच्या अगदी जवळून जात
असतील .कर्कश्श आवाज होत असेल. अस्तित्व संपण्याची भिती निर्माण होत असेल, परंतु संघर्ष करत करत शेवटी त्यांने एका टोमॅटोच्या फळाला शेवटी जन्म दिलाच....!!

या झाडाला ना कोणी पाणी दिल,ना माती दिली,ना खत दिल ना कुणी संगोपन केले, कुठल्याही आधारा-शिवाय याने स्वतःला मोठे केले व फुल-फळा पर्यन्त आणले. याच्या आयुष्याचे उद्दिष्ट फक्त एकच होते ते
म्हणजे फळ देने...

ते उद्दिष्ट याने संघर्ष करून पुर्ण सुध्दा केले.
समाजात काही लोकांना असे वाटते कि आम्ही अपयशी कुचकामी ठरलो. आम्ही आमच्या जिवनात काहीच करू शकत नाही. आम्ही संपलो बरबाद झालो.
त्यांनी या टोमॅटो च्या झाडापासून काहीतरी बोध, शिकवण, प्रेरणा घेतली पाहिजे

तात्पर्य- परस्थिती कशीही येवो जिवनात हताश , निराश , न होता संघर्ष केला पाहिजे.

आपल्या मानवी अस्तित्वाची हिच खरी ओळख आहे..

कुछ पाकर खोना है,
कुछ खोकर पाना है,
जिवन का मतलब तो आना और जाना है.
दो पल के जिवन से एक उम्र चुरानी है...
जिंदगी कुछ भी नहीं बस तेरी मेरी कहानी है...!!



close