shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात कॉंग्रेसच किंग मेकर - प्रभारी दादूशेठ खान.

इंदापुरात कॉंग्रेसच किंग मेकर  - प्रभारी दादूशेठ खान.
    इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व पुणे जिल्हा काँग्रेसचे सह प्रभारी दादूशेठ खान यांनी आज(दि.१६) इंदापुरात तालुका काँग्रेस कमिटीची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चा डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरू आहे इंदापूर तालुक्यातील सभासद नोंदणीचा अहवाल घेण्यासाठी आज ते इंदापूर येथे आले होते.
      इंदापूर तालुक्यामधील काँग्रेस पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. अत्ता सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियान गावोगावी बूत लेवल ला व प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोचवून जास्तीत जास्त सभासद नोंदवण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
        येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते इंदापूरला प्रचारासाठी येथील. इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे जरी ताकत जास्त असली तरी येणाऱ्या काळात काँग्रेसच किंगमेकर ठरणार आहे आणि ते निवडणुकी मधून व मता मधून सिद्ध होईल. पुढील काही दिवसात काँग्रेसमध्ये सुद्धा काही प्रवेश होतील, नवीन लोकांसाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

       यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी स्वागत केलं व संपूर्ण तालुक्याचा आढावा दिला यावेळी कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जकिर भाई काजी, शहराध्यक्ष चीमन भाई बागवान, किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, सरचिटणीस महादेव लोंढे, राहुल वीर , संतोष आरडे , खजिनदार भगवान पासगे , जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आकाश पवार,  श्रीनिवास पाटील , निखिल निंबाळकर , निसार शेख , बाळासाहेब गायकवाड चंदनशिवे आदी उपस्थित होते
close