shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी च्या कु.ऋतुजा वाघमारे चा स्वप्नल फाउंडेशन,पुणे च्या वतीने विशेष सन्मान..स्वप्नल फाउंडेशन पुणे चा स्तुत्य उपक्रम.

कौठळी च्या  कु.ऋतुजा वाघमारे चा स्वप्नल फाउंडेशन,पुणे च्या वतीने विशेष सन्मान..

स्वप्नल फाउंडेशन पुणे चा स्तुत्य उपक्रम.

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १४ मार्च रोजी कौठळी येथील इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी कु. ऋतुजा वाघमारे हिचा स्वप्नल फाउंडेशन पुणे यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार- २०२२ मध्ये उत्कृष्ठ भाषण(वक्तृत्व)केलेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.यापूर्वी देखील कौठळी येथील प्राथमिक शिक्षक  नंदकुमार सूर्यवंशी सर,  भारत ननवरे सर,आरती गायकवाड मॅडम यांनी ऋतुजाचा एक व्हिडिओ यु ट्यूब वर व फेसबूक वर टाकला होता तो व्हिडीओ पाहून स्वप्नल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई बल्लाळ मॅडम यांनी ऋतुजाची हलाखीची परिस्थिती पाहून तिला शाळेत जाऊन पुढील शिक्षण घेता यावे म्हणून शालेय साहित्य व सायकल ऋतुजाच्या घरी येऊन भेट दिली होती.व आज देखील त्यांनी तिला पुण्यात बोलावून तिचे महिला दिनानिमित्त भाषण ठेवले व तिचा मानसन्मान केला व पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
खरच जर अशा हुशार,गरजू मुलांना मदत झाली तर महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.स्वप्नल फाउंडेशन सारखे इतर संस्थांनी देखील असे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  विठ्ठल जाधव (माजी पोलीस महा निरीक्षक), सुनिल हिरूरकर(Assistant to sp pune rular),डॉ राजेंद्र भवाळकर,विद्याताई जाधव,स्वप्नल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई बल्लाळ,उपाध्यक्ष रवी सावंत,सचिव अनिल भुजबळ ऋतुजाचे मामा बाबासाहेब मोरे सह अनेक पुरस्कार्थी मान्यवर उपस्थित होते.
close