होळी कथा ..
वर्षानुवर्षे ऐकत असे
त्याचं होळीच्या कथा
समजली नाही होळी
हीचं खरोखरी व्यथा
फांदीओढा झाडेतोडा
निसर्गां उध्वस्त वृथा
सक्तीची वसूलवर्गणी
निघाला केवढा जथा
बोंबा बोंब शिवीगाळ
पेटवी संस्कृती चिता
नशा पाणी भांग दारू
किं कारण आत्मघाता
पाण्याची मुक्तनासाडी
बकाल करितो तिर्था
थेंबासाठी तरसा नंतर
आपणचं दोषी अनर्था
गल्लीगल्ली पेटे होळी
का जळली नितीमत्ता
भाजून घे स्वार्थपोळी
आडवी तिडवी सत्ता
झाले गेले जळून मेले
निदान बदलूया आता
नवपिढीला नव संदेश
बदलू या उचीत कथा
-
2)
होलिकोत्सव..
होळीधुळवड आली
आता नाही धडगत
टोळ भैरव फिरतात
सक्ती वर्गणी मागत
बहरली सुंदर झाडे
कु-हाडी लागे तोडत
फुलेफांद्या काटक्यां
बळजबरीने ओढत
अफु गांजा करे नशा
मस्तीत राही झिंगत
शिवीगाळ बोंबाबोंब
आंबट शब्दांत रंगत
सुसंस्कृत म्हणवितो
वागणे कसे विसंगत
मुळ हेतू तो सणांचा
कुठे आहे रे सुसंगत
ग्लोबलवाॅर्मिंग पेटले
सुटलो सर्वां सांगत
आधी होतो रे धावत
आता बसलो रांगत
नव विचारे करायचे
होलिकोत्सव स्वागत
हिंदू सण संस्कृतीला
मानत आलेयं जगत
३)
धुळवड ..
रोजची चाललेली
राजकीय धुळवड
सामान्य जनतेची
पाहवत ना परवड
केली आहे आपण
स्व खुशीने निवड
अंगाशी आली का
आपली ही आवड
आरोपप्रत्यारोप ते
एकावर एक चवढ
जनप्रश्न सोडवायां
कुणाले नसे सवड
महत्वाच्याजागेवर
बसले असे सुगड
हातामध्ये त्यांच्या
दिलेतं कसे दगड
होलीका निमित्ताने
शिव्या शाप रग्गड
डोक्यामधे कसला
झाला वाटे बिघड
अधिवेशन येताचं
मना होई धड धड
चुका केल्या कशा
आता होतेय उघड
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
४)
होली है .
बुरा न मानो है होली
बदले जराशी बोली
निमीत्त मात्र सणाचे
कळे मनातली ओली
धडाडा पेटली होळी
मने बनतात मोकळी
चुरुचुरु चालते जीभ
चालायं लागे टकळी
धमाल चेष्टा मस्करी
सवंगड्याची रे टोळी
अतिरेक मात्र नसावा
टिंगळ टावळी टाळी
वाळलेल्या काटक्यां
जाळा चिपाड मोळी
होळी बरोबर सगळी
अभद्र वर्तना जाळी
संयमजरासा बाळगा
देत असताना गाली
राग नको रे यायला
गुलाब फुलावे गाली
सण आगळी होळी
द्वेषावरी मारा फुली
स्वच्छ प्रकाशा न्हाहे
फाल्गुन पूर्णिमाभली
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com

