शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०६ मार्च २०२२
शेततळ्यातून पाणी काढतांना शेवाळावरून पाय घसरून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू..!!
राहाता : तालुक्यातील खडकेवाके येथे अनिल रावसाहेब लावरे (वय 32) या तरुणाचा आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यात जनावरांना पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.अनिलला घरचे काम उरकून पुन्हा बाहेर कामाला जायचे होते. त्याचे जोडीदार त्याला कामावर नेण्यासाठी घरी आले. अनिल कुठे गेला अशी घरी विचारणा केली असता तो पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले असल्याची माहिती घरच्यांनी दिली.
अनिलचे चुलत भाऊ संजय हरिभाऊ लावरे हे अनिलला शोधण्यासाठी शेततळ्यावर गेले. त्यांच्यासोबत बाबासाहेब लावरे, संतोष लावरे, चैतन्य कोल्हे, प्रविण लावरे, अरुण लावरे आणि किरण शेळके हे शेततळ्यावर गेले असता त्यांना तिथे मोकळा हंडा दिसला. तसेच शेवाळावर पाय निसटण्याच्या खुणा दिसल्या. संजय लावरे यांना पोहता येत असल्याने त्यांनी लगेच पाण्यात उडी मारली. त्यांना तळ्यात अनिल यांचा मृतदेह हाती लागला. उपस्थितांच्या मदतीने त्यांनी मृतदेह पाण्याच्या वर काढला. घटनेची माहिती राहाता पोलिसांना कळविण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी साईबाबा सुपर हॉस्पिटल शिर्डी येथे नेण्यात आला.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

