shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खबरदार शेतक-यांचा रस्ता कोणी अडविल्यास होणार तडीपारची कारवाई


प्रतिनिधी : सूर्यकांत होनप

करमाळा : १० / करमाळा येथील पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी करमाळा तालुक्यातील कोणी रस्ता अडविण्याचा बेकायदेशिर प्रयत्न केल्यास त्याचेवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे .

करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कंदर गावातील शेती गट नंबर ४९३,४८२ या गटातील जाणारे पुर्नवर्सन रस्त्यावरून शेतकरी देवडकर व शेतकरी यांचा सतत वाद चालु होता. येथील मा.तहसिलदार साहेब यांनी देखील रस्त्यास मंजुरी देवुन पुर्नरवसन विभागचा रस्ता पुर्वीचा आहे असा निकाल दिले नंतर देखील  शंकर उत्तरेश्वर रान्ने वय ४२ , भिवाजी विष्णु जाधव वय ४९ , सुदाम अरूण जाधव वय २९ रा. कंदर ता. करमाळा जि.सोलापुर व त्याचे साथीदार रस्त्यास देवडकर व इतर शेतकरी यांना विरोध करीत होते .त्यामुळे सतत भांडण तंटा होत होता. मा.तहसिलदार यांनी आदेश देवुन देखील रस्ता अडवित असल्याने सोपान सदाशिव देवडकर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर देखील दिनांक ९/९/२०२२ रोजी रस्ता अडविला . नंतर त्यांचेत पुन्हा भांडणे होवु नये व सरकारी आदेशाचे पालन व्हावे याकरीता सदर व्यक्तींना फौजदारी प्रकीया सहीता कलम १५१(३) प्रमाणे अटक करून मा. न्यायालयात हजर केले असताना मा. न्यायालयाने दोन्ही बाजुचे पुरावे ऐकुन पोलीसांनी सादर केलेले पुरावे ग्राहय धरून  शंकर उत्तरेश्वर रान्ने , भिवाजी विष्णु जाधव , सुदाम अरूण जाधव रा. कंदर ता.करमाळा जि.सोलापुर यांना मौजे कंदर ता. करमाळा यामध्ये आज पासुन ३० दिवस स्थानबध्द करणे बाबत आदेश केले होते.

सदरची कामगिरी मा.सुर्यकांत कोकणे, पोलीस निरीक्षक, सचिन जगताप, सहा. पोलीस निरीक्षक, विनायक माहुरकर पोलीस उपनिरीक्षक व स्टाफ यांनी केली आहे. सदरचे स्थानबध्द करण्यात आलेल्या कारवाईव्दारे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी करमाळा तालुक्यातील कोणी रस्ता अडविण्याचा बेकायदेशिर प्रकार केल्यास त्याचेवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
close