अमरावती:- आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन आज साजरा करण्यात आला.या दिवशी रोगाबाबत जनजागृती करून या रुग्णांना लवकर निदान,लवकर उपचार कसा देता यईल यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले
या रोगाबाबत प्रशिक्षनार्थ्यांना सखोल ज्ञान मिळून या कर्मचाऱ्यांद्वारे योग्य सेवा जनतेला मिळावी म्हूणन आज संस्थेचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अनेक ग्रुप तयार करून थीम बेस ऍक्टिव्हिटी मधून क्षयरोगाबाबत जनजागृती म्हूणन छोटा पण महत्वाचा संदेश देण्याचा सर्व ग्रुपने प्रयत्न केला.क्षयरोगाची पाश्वभूमी काय आहे? रोग कसा होत? त्याचा प्रसार कसा होतो?त्याची लक्षणे?त्याचा उपचार?आणी रोग झाल्यावर घेण्याची काळजी असे अनेक पहेलू सर्व ग्रुपने लक्षवेदी थीम मधून दाखवण्याचा उत्कृष्ठ प्रयत्न केला.
त्या नंतर क्षयरोग या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनेक प्रशिक्षनार्थी कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन क्षयरोग बाबत अनेक मुद्धे वक्तृत्व स्पर्धेतून स्पष्ट केले.
क्षयरोगाबाबत ग्रुप तयार करून प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले.
क्षयरोग विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करून क्षयरोगाबाबत पथनाट्य करून प्रशिक्षणार्त्यांनी क्षयरोगाबाबत जनजागृती केली.
संस्थेचा सर्व परिसर व जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरासत क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
क्षयरोगमुक्त भारत होण्यासाठी शासन अनेक स्तरावरून उपक्रम राबवत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे ठरवले आहे पंरंतु भारत सरकारने 2025 पर्यंतच भारतात क्षयरोग दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
जगाच्या तुलेनेत एक तृतीयांस रुग्ण एकट्या भारतात आहेत.
भारतात दर सहा मिनिटाला एक क्षयरुग्ण आपले प्राण गमावतो.
माघील दोन वर्षांपासून धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना पेक्षा ही भयंकर परिस्थिती क्षयरोगाची आहे,
हा रोग फक्त गरिबांना होतो माघील जन्माच्या पापामुळे होतो,या रोगावर उपचार नाही अशा अनेक अंधश्रद्धा समाजात क्षयरोगाबाबत आहेत.
या रोगाबाबत असणारी अंधश्रद्धा दूर करून लवकर निदान करून लवकर पूर्ण उपचार घेतला तर हा रोग निश्चित बरा होतो.
या रोगाबाबत कुठलाही दुजेभाव न करता रुग्णांना धीर देऊन उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. क्षयरुग्णांना निशय पोषण योजने मधून उपचार सुरु असे पर्यंत 500 प्रतिमहा दिले जातात.तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना निदाणासाठी देखील 500 दिले जातात.
प्रत्येकाने आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेमध्ये वाढ करून क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले पाहिज़े.या वर्षीचे २४ मार्च चे घोषवाक्य' *Invest to End TB. Save Lives*”. टीबी संपवण्यासाठी गुंतवणुक करा व जीव वाचवा हे आहे. हे अभियान सर्व सहभागाने यशस्वी करण्याचे आवहन. संस्थेचे मा.प्राचार्य डॉ.डवले सर यांनी अध्यक्षीय भाषानातून व मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.शिरसाट सर यांनी प्रास्ताविक भाषानातून स्पष्ट केले.
कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवर व कर्मचारी वर्गानी क्षयरोग जनजागरण पर शपत घेतली.क्षयरोग जनजागृतीपर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत श्री.दत्ताराव रोटे यांचा पाहिला,श्री.युवराज शिंदे यांचा दुसरा तर श्री.राहुल आटोळे यांचा तिसरा क्रमांक आला.
तसेच थीम बेस ऍक्टिव्हिटी मध्ये श्री.राहुल आटोळे, यांच्या ग्रुप चा प्रथम क्रमांक तसेच श्री.देवेंद्र संभे यांच्या ग्रुप चा दुसरा व श्री.गेडाम यांच्या ग्रुप चा तिसरा क्रमांक आला.सर्व विजेता कर्मचारी व ग्रुपला संस्थेचे प्राचार्य मा.डवले सर व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरण्यात आले.
वरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हूणन मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.शिरसाट सर तसेच संस्थेचे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.बनसोड सर,पर्यवेक्षक श्री डोंगरे सर व सातपुते सर व सर्व प्रशिक्षनार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री डोंगरे सर यांनी केले.

