रासप उद्योग व्यापार आघाडी इंदापूर तालुका अध्यक्षपदी धनाजी गोडसे यांची तर कला क्रीडा व सांस्कृतिक आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी किरण राऊत यांची निवड .
इंदापूर प्रतिनिधी: आज इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक इंदापूर मधील हॉटेल जगदंबा येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष उद्योग व व्यापार आघाडी इंदापूर तालुका अध्यक्षपदी हॉटेल जगदंबा चे मालक श्री धनाजी गोडसे यांची निवड करण्यात आली. व रा स प कला क्रीडा व सांस्कृतिक आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी किरण राऊत सर यांची निवड झाली , सदर निवडी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफने ,जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तालुका अध्यक्ष सतीश तरंगे आदींच्या हस्ते करण्यात आल्या.
त्याचबरोबर इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर आणि ताकतीने लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण गोफने यांनी सांगितले .तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ शाखांचे उद्घाटन येत्या पंधरा दिवसात करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. या बैठकीला पुणे जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड, इंदापूर विधानसभा अध्यक्ष श्री मनेश जाधव सर,
युवक तालुका अध्यक्ष अभिजित बाळे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष गणेश हेगडकर, ज्येष्ठ नेते तानाजी शिंगाडे, नवनाथ कोळेकर, संतोष नरुटे, ॲड. दिलीप धायगुडे, सोमनाथ पांढरपीसे ,अशोक कोळेकर, नितीन कोळेकर ,आप्पा माने, अविनाश मोहिते, अतुल शिंगाडे ,सोन्या जानकर, रंजीत सातपुते , पिकू पाटील ,ज्येष्ठ नेते अंकुश हरणावळ या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

