shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेडले परमानंद येथील भाविकांची नर्मदा परिक्रमा यात्रा १०३ दिवसांत पुर्ण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०७ मार्च २०२२

खेडले परमानंद येथील भाविकांची नर्मदा परिक्रमा यात्रा १०३ दिवसांत पुर्ण..!!
 
नेवासा : नर्मदा ही मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. तसेच नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे. अशी ही पवित्र परिक्रमा पूर्ण करण्याचे भाग्य नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील गणपत गिरी, ज्ञानदेव जाधव, राघुनाना माळी, दौलत तुवर यांना लाभले. नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण करुन चौघे गावी परतले आहे. गेल्यावर्षी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी चौघांनी खेडले परमानंद येथून नर्मदा परिक्रमासाठी गेले होते. नर्मदा परिक्रमा यात्रा पूर्ण करण्यासाठी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांचा कालावधी आहे. परंतु पायी परिक्रमेचा संकल्प करून सुमारे १०३ दिवसांनी म्हणजे ५ मार्च २०२२ रोजी रोजी तो तडीस नेत ३ हजार ६०० किलोमीटर चे अंतर पायी चालत पुर्ण केले. 

गणपत गिरी, ज्ञानदेव जाधव, राघुनाना माळी, दौलत तुवर हे आज नर्मदा परिक्रमा पूर्ण करून गावी परतल्याने त्यांच भव्य स्वागत करण्यात आले. तसेच गावातुन मिरवणूक काढण्यात आली. तसेच स्वागतासाठी महिलांनी सर्वत्र रांगोळी काढली होती. तसेच परमानंद गिरी महाराज मठात आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. ह.भ.प. अन्सराम महाराज मिसाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. 
श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण भास्करगिरी जी महाराज यांच्या हस्ते चौघांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कीशोर केदारी,दादासाहेब रोठे, दौलतराव तुवर, दादा तुवर, राजाबापु शिंदे, भाऊसाहेब तुवर, खंडु बनकर, भानुदास शिंदे, मना तुवर, चांगदेव गोसावी, भाऊसाहेब शिंदे, नाना शिंदे, दगुबाबा हवालदार, आदिनाथ गिरी, बाळासाहेब गिरी, जनार्दन गोसावी, बंटी गोसावी, विजुनाना राजळे, रामा गांगवे, राहुल भुजबळ,ग्रामपंचायत कर्मचारी पेत्रस वैरागर, नानाभाऊ तुवर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close