दिव्यांग महिलांचा करण्यात आला सत्कार
प्रतिनिधी : संजय वायकर
पुणे :१५ / दरवर्षी प्रमाणे इनेंब्लर चॅरेटेबल ट्रस्टच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम केला जातो यावर्षी वेगळ्या पध्दतीने कार्यक्रम केला . महाराष्ट्रात प्रथमच दिव्यांग महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला .विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले व मान्यवरांचे तसेच सभासद व पत्रकार यांचे सत्कार करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल सिंगारे प्रमुख पाहुणे शिवभक्त डॉ .श्रीकांतजी धुमाळ गुरुजी ज्योतिषी विशारद व सिनेअभिनेते सिद्धेशवर झाडबुके यांचाही सत्कार करण्यात आला . आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता उपाध्यक्ष पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला . तसेच शिवभक्त डॉ . श्रीकांतजी धुमाळ आध्यात्मीक गुरु यानी छत्रपती शिवाजी महाराज पुष्पा अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली . होम मिनिस्टर विजेते झालेले महिलांना बक्षीस दिले व मार्गदर्शक गुरुजी डॉ . धुमाळ यांनी दिव्यांग महिलांना शासनाचे स्कीमचे माहिती दिली . छोटे मोठे व्यवसाय करण्यास लोन कसे मिळवतात तसेच पापड लोणचं व शिलाई मशीन गिरणी मेणबत्ती अगरबती छोटे व्यवसाय करण्यास मार्गदर्शन केले .

