shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सांताक्रूझ(पूर्व),मुंबई येथे आरोग्य तपासणी शिबीर..!

मुंबई : आंतराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस आणि श्री कृष्ण चाळ शिवजयंती उत्सव युवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मा श्री ॲड.विक्रांत वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा श्री विवेक जी साळवी साहेब जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नाने श्रीकृष्ण चाळ कमिटी, वाघरीवाडा, दत्तमंदिर रोड,वाकोला, सांताक्रूझ(पूर्व),मुंबई येथे *आरोग्य तपासणी शिबीर* सोमवार दि २१ मार्च २०२२ रोजी सकाळी १०:०० ते ०४:०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.

यात सुमारे १८५ नागरिकांची मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व नेत्र रोग तपासणी करून त्यांना औषध उपचार करण्यात आले वाकोला सांताक्रूझ विभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतला
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे ॲड अभय सोडये मुंबई अध्यक्ष लीगल एड, श्री संतोष चोथे सदस्य, श्री एँलथन फर्नांडीस सदस्य, विनोद गवंडे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले तर 
श्रीकृष्ण चाळ शिवजयंती उत्सव समितीचे श्री योगेश पारडळे, श्री प्रदीप वाईत, श्री तेजस निंबरे, श्री संतोष पवार, श्री विकी फर्नांडिस, श्री निलेश आग्रे, श्री मयूर परब, श्री सिद्धेश शिर्सेकर, श्री देवराज मांजरेकर, सिद्धेश पाटील, श्री यतीन मुळीक यांनी सहकार्य केले.
close